नवी मुंबई : हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील स्वतंत्र सैनिकांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळाला सिडको ने गेल्या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर खारघर येथील से.३३ मध्ये शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी जागा दिली आहे त्याबद्दल संस्थेचे संचालक डॉ जी के डोंगरगावकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जल्मदिनी या जागेवर बुद्धगयेतील महाबोधी विहारातील बोधीवृक्षाचं बीज तथा बोधीवृक्षाचे रोपण संस्थेच्या वतीने केले . या निमित्ताने संस्थेतील शाळा , कॉलेज प्रमुख, शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिडको ने संस्थेला भूखंड दिला त्याबद्दल संस्थेच्या वतीने सिडको प्रशासनाचे आभार मानण्यात आले. यानिमित्ताने नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड मध्ये विद्यार्थाने पेढे वाटप केले असे या संस्थेचे विद्यार्थी सागर गवई यांनी सांगितले.
या संस्थेच्या वतीने १९९१ पासून रायगड जिल्यात शैक्षणिक कार्य सुरु आहे. सहा शाळा , तीन कॉलेज आणि एक संशोधन संस्था तसेच भटक्या जाती जमाती व आधिवासीयांसाठी आश्रम शाळा या संस्थेद्वारे चालविली जाते. नवी मुंबईत आज पर्यंत १६४ भूखंड शैक्षणिक उपयोगासाठी विविध संस्थांना दिली आहेत. त्यापैकी पनवेल -उरण मध्ये ६४ भूखंड आणि ठाणे तालुक्यातील सिडको क्षेत्रात १०३ भूखंड दिले आहेत. त्यापैकी दक्षिण आणि उत्तर भारतीय शिक्षण संस्थांना नाममात्र केवळ ७५ रुपये चौरस मीटर शाळेसाठी जागा दिली. आजरोजी या संस्थेला ११२८४ रुपये चौरस मीटर दराने ही जागा मिळाल्यामुळे संस्थेत सिडको प्रशासन विरोधात असंतोष असल्याचे शिक्षक पालक संघाच्या प्रमुख डॉ निधी अग्रवाल यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवले . संविधानिक मूल्यावर विश्वास ठेऊन कार्यकरणाऱ्या या संस्थेला एक आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीला एक भूखंड मिळाला अन्यथा १६२ भूखंड व्यापारी तत्वावर विश्वास असलेल्या संस्थांना देऊन सिडको असंवधानिक व भेदभाव जन्य वर्तन केले असल्याचे चर्चा सध्या नवी मुंबईतील शैक्षणिक क्षेत्रात सुरु आहे. प्रतिकूल परिस्थिती मध्ये संविधानिक मूल्याचे संस्कार करणाऱ्या या शाळेला शाळेच्या भूखंडावर सत्याग्रह शैक्षणिक संकुल उभे करण्यात येणार आहे असे डोंगरगावकर या कार्यक्रमात म्हणाले . नवी मुंबईतील खारघर या अति श्रीमंत लोकवसतीत सत्याग्रह संकुल आणि या संकुलात विश्वकल्याण व बंधुत्वाची समृद्धी या बोधी वृक्षाखाली राजपुत्र सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली त्या वृक्षाची फांदी सत्याग्रह भूमीत आज दिवशी लावण्यात आली याचा आनंद व्यक्त करताना या शैक्षणिक संकुलातलं बोधिवृक्ष बुद्धाचा कुशल कर्माचा सिद्धांत सर्व विद्यार्थी आत्मसात करतील या प्रेरणेतून बोधिवृक्ष येथे लावला आहे, असे या प्रसंगी रत्नमाला डोंगरगावकर म्हणाल्या.
जवळपास ८ कोटी रुपये संस्थेने या भूखंडाची भरले असून गरीबाच्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्यासाठीच या संस्थेचा प्रयत्न असेल त्यातून छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ही संस्था जपत आहे. सिडकोने या सर्व बाबीचा विचारकरून २०१८ रोजी जाहीर केलेली पायाभूत किंमत घेऊन अतिरिक्त रक्कम संस्थेला सामाजिक न्यायासाठी परत करावी असे डोंगरगावकर या प्रसंगी म्हणाले.
एक विठ शाळाबंधकामासाठी उपक्रम राबविला जाणार असल्याचे या संस्थेचे आजीमाजी विद्यार्थी संघाने निश्चित केले असून येत्या शैक्षणिक वर्षात निधी उभारणीसाठी अनेक सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम राबविले जाणार आहे असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी एम एल सूर्यवंशी , नेहा कोपते , प्रा वनिता सूर्यवंशी , भगवान कांबळे , अमरचंद्र हाडोलतिकर, आशा शिंदे , डॉ निधी अग्रवाल, प्रमिला सणस ललिता यशवंते, या सह विद्यार्थी- पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबईतील सत्याग्रह भूमीत बोधीवृक्षाचे रोपण सर्वासाठी प्रेरणादायी : प्रा डॉ जी के डोंगरगावकर !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर





