पनवेल : सह्याद्रीच्या मूळ डोंगररांगांपासून विलग झालेल्या एका डोंगराच्या कुशीत असणारा खारघरचा जणू मुकुटमणी म्हणजे “पांडवकडा धबधबा”.मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा धबधबा व आजुबाजूचा नयनरम्य निसर्ग परिसर लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.पाऊस चांगला रुळला की पर्यटकांचा ओघ या पांडवकड्याकडे चालू होतो.
पण गेली अनेक वर्ष पांडवकडा हा पर्यटकांसाठी शासनामार्फत बंद करण्यात आला आहे.येथे होणारे अपघात हे कदाचित प्रमुख कारण असावे.पण योग्य प्रकारे सुरक्षारक्षक तैनात करून पावसाळ्याच्या चार महिन्यांपुरता सदर परिसर पर्यटनासाठी खुला करावा अशी मागणी काल भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळातील नगरसेवक व पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली.
सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून इतरही सुविधा येणार्या पर्यटकांना पुरवील अशा संस्थेला चार महिन्यांसाठी नियुक्त केल्यास पर्यटकांना सुरक्षितपणे या निसर्गरम्य परिसराचा आश्वाद घेता येईल.याबाबत कैलाश शिदें साहेब म्हणाले कि सदर क्षेत्र वनखात्याचे अखत्यारित येत असून त्यांच्याशी चर्चा करुन पुढिल निर्णय घेण्यात येईल.यावेळी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल,नगरसेवक अभिमन्यू पाटील,सरचिटणिस किर्ति नवघरे,जिल्हा चिटणिस साै.गिता चौधरी,जिल्हा उपाध्यक्षा साै.संध्या शारबिद्रे,मंडल उपाध्यक्षा साै.बिना गोगरी,मा.नगरसेवक श्री.गुरुनाथ गायकार,श्री.वासुदेव पाटील,साै.वैशाली प्रजाजती,श्री.गुरुनाथ म्हात्रे,श्री.गिरिश गुप्ता,श्री.शैलेंद्र त्रिपाठि आदि मान्यवर उपस्थित होते.

पांडवकडा धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा ! भाजपची मागणी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »




