Press "Enter" to skip to content

रत्नदीप सोप्ट्सच्या पुढाकाराने नवी मुंबईत सिझन क्रिकेट प्रशिक्षण वर्ग सुरु !

नवी मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने नवी मुंबईतील ८ ते १५ वयोगटातील होतकरू मुला -मुलींसाठी आधुनिक सिझन क्रिकेटचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सदर प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन नुकतेच जुईनगर येथील लक्ष्मीबाई मुंबईकर मैदानात संपन्न झाले.

यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव शहा आलम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव यांच्या शुभहस्ते सदर उदघाटन संपन्न झाले. यावेळी बीसीसीआय प्रशिक्षक दिलीप पाटील, क्रिकेट प्रशिक्षक नंदू दोनवलकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, माजी नगरसेवक विशाल ससाणे, समाजसेवक किरण मेहेर, क्रिकेट दर्शन भोईर, प्रकाश टिपणीस, राजन मुणगेकर तसेच नवोदित खेळाडू व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

होतकरू खेळाडूंना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण मिळण्याच्या उद्देशाने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, माजी नगरसेवक विशाल ससाणे, समाजसेवक किरण मेहेर यांनी मैदान तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी बीसीसीआय प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. नवी मुंबईतील खेळडूंना संधी आणि प्रशिक्षण मिळण्यासाठी रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे, उपाध्यक्ष प्रकाश टिपणीस, सचिव जी बी मोहिते, कोषाध्यक्ष दिलीप घाडी, सदस्य संजय शिंदे, अशोक जाधव, अमित मोहिते तसेच संपूर्ण टीम सातत्याने उपक्रम राबवित आहे.