Press "Enter" to skip to content

सायकलपटू सई पाटीलची विश्व विक्रमाकडे वाटचाल ! डॉ.संजीव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा !

पनवेल : ठाण्याच्या बाळकुम येथील सायकलपटू सई पाटील या बालिकेने पर्यावरण संरक्षण आणि मुलींना शिकवा मुलींना वाढवा हा सामाजिक संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी असे चार हजार किलोमीटर सायकल मोहीम सुरू केले आहे. दोन हजार किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार केले असून पनवेल येथून तिने उर्वरित दोन हजार किलोमीटर प्रवासाचा शुभारंभ केला. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सईला‌ शुभेच्छा देत ती विश्व विक्रमाला गवसणी घालेल, असा विश्वास व्यक्त केला.
सई ही 10 वर्षाची अजुन आगरी-कोळी समाजाची मुलगी आहे.स्व. दी.बा.पाटील सांस्कृतिक क्रीडा मैदान,रोडपाली,पनवेल या ठिकाणी तीचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी तीचे वडील आशिष पाटील हे देखील सोबत आहे . जलपरी या नावाने ती प्रसिद्ध आहे. दर दिवशी ती 100 किलो मीटर सायकलने प्रवास करीत आहे.
सईचे वय लहान असले तरी तिने मोठा संदेश देण्यासाठी सायकल मोहीम आरंभली आहे. आम्ही सगळे या मोहिमेत तिच्या पाठीशी आहोत. पुढील दोन हजार किलोमीटरचा टप्पा देखील ती यशस्वीपणे, सुरळीत पार पाडेल, अशा सदिच्छा डॉक्टर नाईक यांनी यावेळी तिला दिल्या. प्रत्येकाने सायकल जरूर चालवावी यामुळे प्रदूषण आटोक्यात येण्यास मदत तर होईलच शिवाय इंधनाची देखील बचत होईल असे आवाहन सईने यावेळी केले.
पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, नगरसेवक संतोष शेट्टी, हरेश केनी, नगरसेवक अमर पाटील, समीर भोईर, सुनील पाटील आदी मान्यवर सईला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.