नवी मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नवी मुंबईच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याविरोधात वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आरपीआय चे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब मिरजे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे लोकसभा युवक अध्यक्ष अॅड. यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली “आयुक्त हटवा नवी मुंबई वाचवा” तीव्र निदर्शने करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त गेल्या तीन-चार महिन्यांपासून सामाजिक प्रश्नांत बाबत गंभीर नाहीत म्हणून निदर्शने करण्यात आली.
आरपीआयच्या वतीने सातत्याने नवी मुंबईतील विविध सामाजिक हिताच्या प्रश्नासाठी पत्रव्यवहार करणे त्याचप्रमाणे 8 ऑक्टोबरमध्ये भव्य ईशारा मोर्चा देखील रिपाईने काढला होता त्यावेळी देखील त्यांनी ठोस असे उत्तर दिले नाही. बोळवण करण्याचा प्रकार केला गेला असा आरोप यावेळी करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रश्नांबाबत 6 डिसेंबर पर्यंत खुले करण्याची तारीख घोषित न करणे, त्याचप्रमाणे नवी मुंबईतील झोपडपट्टी संदर्भात ओळखपत्र तयार असताना देखील ओळखपत्र वाटप न करणे, कोणतेही ठोस कारण न देता जे झोपडीधारक चाळीस वर्षापासून राहत आहेत त्या झोपडीधारकांना अपात्र करणे, त्यांना पात्र न करून घेणे, 2011 पर्यंत वाढलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देणे, 2011 पर्यंत जे झोपडीधारक राहतात त्यांना संरक्षण आहे त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे, ज्या सफाई कामगारांमुळे नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षणात पहिली आली त्या कामगारांना शासकीय परिपत्रकानुसार नुसार समान काम समान वेतन न देणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या ठेकेदारांची मुदत संपली असताना देखील मुदत न वाढवता बेकायदेशीर काम चालू ठेवणे, पुनर्विकासात नियमितता नसणे असे विविध सामाजिक विषय या प्रश्नांची सोडवणूक न करणे,
त्यामुळे सामाजिक प्रश्नांकडे जे प्रशासक दुर्लक्ष करतात त्यासाठी “आयुक्त हटाव नवी मुंबई बचाव” हे आंदोलन करण्यात आले येत्या काही दिवसात जर आयुक्तांना हटवले गेले नाही किंवा सामाजिक प्रश्न सोडवले नाही तर प्रत्येक वार्ड ऑफिसच्या बाहेर धरणे आंदोलन केले जाईल. तसेच अॅड. यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निदर्शनावेळी महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई बोदडे, बाळू गायकवाड, रमेश बोदडे, इमरान शेख, विशाल कांबळे, अभिमान जगताप, विनोद वानखेडे, बाबासाहेब माने, कविता भंडारे, आप्पा माने, राहुल कसबे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्त हटवा, नवी मुबंई वाचवा” आरपीआयचे तीव्र निदर्शने !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !




