Press "Enter" to skip to content

ज्या ठिकाणी रेसिडेंसीयल एरिया झालेली नाही त्या ठिकाणी रस्त्याचा अट्टहास कशासाठी : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा सवाल !

पनवेल : रोहिंजन येथे २४ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटार बांधणे आणि तलावावर पुलाचे बांधकाम करणे या कामांकरिता ‘ठाकूर इन्फ्रा’ या कंपनीला ठेका देण्यास स्थायी समितीने गेल्या गुरुवारी मंजुरी दिली. त्यावेळी चर्चेदरम्यान परेश ठाकूर यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची नोंद करण्यात आली. यावेली विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी त्याना यावर बोला असे सांगितले. मात्र ते तटस्थ राहिले. बाकीचे विषय मंजूर करत तेव्हा तुम्ही लगेच बोलता मात्र याविषयी तुम्ही तटस्थ भूमिका काय घेता त्यामुळे तुमचा नक्की कशाला विरोध आहे असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. याचा खुलासा परेश ठाकूर यांनी केला नाही. त्यामुळे येथे रस्त्याचा विषय घेऊ नका असे प्रीतम म्हात्रे यांनी सुचवले. याबबातची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी पत्रकाराना दिली. यावेली नगरसेवक गणेश कडु, अरविंद म्हात्रे, सतीश पाटिल,रवीन्द्र भगत उपस्थित होते.

            दोन दिवसापूर्वी कळंबोली, तळोजा, नावडे, धानसर, रोहिंजण आदी पट्ट्यातील अनेक विषय मंजूर करून घेण्यात आले आहेत. परंतु या विषयाचा पाठपुरावा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केलेला आहे. आता फक्त हे विषय मंजूर करून घेवून नारळ फोडण्याचे काम सत्ताधारी करणार आहेत. जनता सुज्ञ असून महाविकास आघाडीचे काम त्यांच्या समोर असल्याने जनतेला सामोरे कसे जायचे? त्यामुळे सत्ताधार्‍यांनी हे विषय मंजूर करून घेतल्याचे मत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ४६ विषय मांडण्यात आले. त्यापैकी ४४ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मलनिस्सारण वाहिन्या, अंतर्गत गटारे, मासळी बाजार, रस्ते काँक्रीटीकरण, डांबरीकरण अशा स्वरूपांच्या जवळपास ६५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. याकंपनीलाच रोहिंजन येथील रस्त्याच्या कामासाठी २४ कोटी ५४ लाख रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. नऊ तारखेला जी सभा झाली त्यात 46 विषय झाले त्यात काही विषय वगळता सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. हे विषय पास झाले आहेत त्यातील 70 टक्के विषय महविकास आघडीचे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांच्या प्रभागातील आहेत. त्याचा पाठपुरावा महा विकास आघाडीचे नगरसेवक गेली साडेचार वर्षे करत आहेत त्यामुळे विकास कामांना आमचा कधीही विरोध नाही. असे प्रितम म्हात्रे यानी स्पष्ट केले. टेंडर प्रक्रियेला आम्ही विरोध करत नाही त्याच्या प्रक्रिया प्रमाणे टेंडर होतो. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम होणार आहे त्या ठिकाणी अद्याप ही रेसिडेंशल एरिया झालेली नाही त्यामुळे 25 कोटीचा खर्च कशासाठी करतो असा सवाल विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी विचारला. हेच पैसे आपण कोविड काळात वापरू शकतो. तिसरी लाट येऊ घातली आहे त्यासाठी हे पैसे खर्च करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली. डेल्टा व्हेरीइंट जोरात येऊ पाहत आहे त्यासाठी हे पैसे खर्च करावेत असेही त्यानी सुचवले.

           रोहिंजन येथे जे काम सुरू होणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची अडचण आहे. 14 ते 15 शेतकऱ्यांची अडचण आहे यातील काही शेतकरी कोर्टात देखील गेलेले आहेत. त्यामुले येथे रस्त्याचा अट्टहास  कशासाठी करतात असा सवाल विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचा विकास कामाना कधीही विरोध नाही. मात्र येथील शेतकरयना डाव्लु नका असे म्हात्रे यानी सांगितले. साडेचार वर्षात विरोधी पक्षनेते असताना कधीही कॉन्ट्रॅक्ट मिळवलं नाही घेतलं नाही असं ठणकावून प्रितम म्हात्रे यांनी सांगितलं. विरोधी पक्ष नेते आणि नगरसेवक हे जनतेने आम्हाला जनतेची कामं करण्यासाठी निवडून दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. जयाठिकाणी चुकीचं काम होत असेल त्याठिकाणी विरोधी पक्ष नेहमीच विरोधाची भूमिका घेईल. विकास कामांना विरोध करणे म्हणजे विरोधी पक्षाचे काम आहे असे नाही. करामध्ये तीस टक्के सवलत मिळाली हे केवळ महा विकास आघाडीमुळेच मिळाली आहे आम्ही विरोध केला त्यामुळे पालिकेला 30 टक्के सवलत द्यायला भाग पाडले. यातही आम्ही खुश नाही आम्हाला पन्नास टक्‍के सवलत हवी आहे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. त्यासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सोबत याबाबत बोलणी सुरू असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्सला आमचा विरोध कायम आहे।

       साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत पालिकेने ४६ विषय कधी घेतले नाहीत. ते आत्ता घेतले मात्र 24 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे टेंडर आहे याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर येईल टॉयलेटचे बांधकाम तोडण्याला देखील महाविकास आघाडीचा ठाम विरोध आहे असे सांगण्यात आले. तर नगरसेवक गणेश कडु यांनी शौचालय साफ करण्यामध्ये भ्रष्टाचार झाले असल्याचा आरोप केला. तर नगरसेवक अरविंद म्हात्रे यानी शौचालयाची साफ़सफ़ाई करण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »