Press "Enter" to skip to content

मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त व दरडग्रस्त भागात स्वच्छतेचे काम करून आलेल्या सफाई कामगारांना दोन महिन्याचे वेतन द्यावे : रामदास आठवले !

मुंबई : पूरग्रस्त व दरडग्रस्त महाड, चिपळूण,सांगली ,कोल्हापूर या शहरांना व अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती होती.अशा गंभीर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता तिथे आठ दहा दिवस स्वच्छतेचे चांगले काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला याचा मला निश्चितच आनंद आहे. अशा या सफाई कामगारांना मुंबई महानगरपालिकेने एक नव्हे तर दोन महिन्याचे अतिरिक्त वेतन द्यावे व डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसफल्य योजनेत कायम स्वरूपी घर देण्यात यावे अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी काल आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सफाई कामगारांचा स्वच्छता सैनिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करताना केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनियनचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी केली.आरपीआयचे गौतम सोनवणे,सुमित वजाळे,सुभाष दळवी,संजय कापसे,सिध्दार्थ कदम,बी जी पडवळ,आत्माराम कांबळे,दिलीप थोरवडे,वसंत जाधव,एस पी जाधव,विलास साळवे,विजय जाधव,नितीन कांबळे,रुपेश परुळकर,स्वप्निल विद्याधर,अतुल कांबळे,अंगद रणदिवे,विशाल गायकवाड,शिरीष चिखलकर,सुनील कांबळे,डी एन शिर्के ,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

ना आठवले यांनी, म्युनिसिपल कामगार संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी युनियनच्यावतीने एक चांगला कार्यक्रम घडवून आणला.ते अभ्यासू व कामसू आहेत. आपण साऱ्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन चांगले काम करून आलात आपला सन्मान झाला पाहिजे असे जाधव यांना वाटत होते. त्या प्रमाणे हा सन्मान होतोय. सुभाष दळवी यांचा सन्मान माझ्या हस्ते झाला याचा मला विशेष आनंद झाला असल्याचे सांगून ना. रामदास आठवले यांनी यावेळी स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे ही काम आपण केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे व ते जगवले पाहिजे.

रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी सांगितले की, आपण सुभाष दळवी त्यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त व दरडग्रस्त भागात जाऊन चांगले काम करून आलात त्याबद्दल तुमचे कौतुक करण्यासाठी मी आलो आहे.आपण तिथे साचलेल्या चिखलात झोकून देऊन सफसफाईचे काम केले त्या बद्दलही त्यांनी सफाई कामगारांचे रिपब्लिकन पक्षातर्फे आभार मानले. व मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे प्रश्न ना रामदास आठवले तडीस नेतील असा विश्वासही गौतम सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.म्युनिसिपल मजदूर संघाच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी स्वच्छता सैनिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »