नवी मुंबई : वाशी येथील श्रद्धा आणि एकता सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम नियमानुसारच सुरू आहे, येथील पुनर्विकासात घोटाळा झाल्याचे आरोप विनाआधार आहेत, अशी स्पष्ट भूमिका अरिहंत बिल्डर्सचे सीएमडी अशोक छाजेर यांनी वाशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
वाशातील श्रद्धा आणि एकता सोसायीच्या पुनर्विकासात बेकायदा कागदपत्रे जमा करून मनपाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विकासकाने बेकायदा सीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करीत ऍड यशपाल ओहळ आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मिरजे यांनी केंद्रीय गृनिर्माण मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडॆ तक्रार केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
सदर प्रकारणी या पुनर्विकास प्रकल्पाचे विकासक अशोक छाजेर यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. सदर पुनर्विकास कामात कोणत्याही प्रकारचा बेकायदा मार्ग अवलंबलेला नसून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची भूमिका अशोक छाजेर यांनी मांडली. सदर कामात अडथळा आणून तक्रारदार नागरिकांचे नुकसान करीत असल्याची भावना श्री छाजेर यांनी मांडली. ज्यांनी आरोप केले त्यांनी नुसते निवेदन देऊ नये, ज्या नागरिकांवर अन्याय झाला त्यांना पुढे आणावे म्हणजे सत्य समोर येईल, असे देखील अशोक छाजेर म्हणाले.

श्रद्धा आणि एकता सोसायटीचा पुनर्विकास नियमनानुसार ! अशोक छाजेर यांची माहिती !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




