Press "Enter" to skip to content

समाजभिमुख नेतृत्व : समीर कदम !

  • २२ व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली !
  • धानसर ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच म्हणून यशस्वी कारकीर्द !
  • पनवेलमध्ये कार्याचा ठसा उमटविला !
  • सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाद्वारे समाजमनात स्थान !
  • खारघर विभागात विशेष योगदान !

पनवेल : प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्षातून निर्माण झालेल्या व्यक्तिमत्वांची नाळ सदैव मातीशी जुळलेली असते. सामाजिक दायित्व हेच आपल्या समाजकारण आणि राजकारणाचे अंतिम ध्येय मानतात, अशी व्यक्तिमत्वे सदैव समाजाच्या मनात असतात. असेच एक समाज मनातील व्यक्तिमत्व म्हणजे खारघर येथील धडाडीचे नेतृत्व समीर श्रीकांत कदम होय. एक समाजभिमुख नेतृत्व , संयमी नेता म्हणून समीर कदम यांनी आपला ठसा उमटविला आहे.

सातारा जिल्यातील कोयना हे समीर कदम यांचे मूळ गाव आहे . मात्र, कोयना धरणाच्या निर्माणासाठी कुटुंबाने स्वतःचे गाव , घर त्यागले. सरकारने कोयना धरण विस्थापितांचे १९५८ साली पनवेल तालुक्यात पुनर्वसन केले. येथील धारणा कॅम्प येथे ६० वर्षांपूर्वी समीर कदम यांचे कुटुंबीय स्थायिक झाले. समीर कदम यांचा जन्म पनवेल मध्येच झाला, पण म्हणतात ना, संघर्ष आणि त्याग हा रक्तातून येतो. आज समाजासाठी त्यांची असलेली धडपड, जाणीव, तळमळ यातून ते दिसून येते. समीर कदम यांचे बालपण आणि शिक्षण धरणाकॅम्प, तळोजा येथे झाले आणि १२ वीनंतर आयटीआयचे प्रशिक्षण घेतले. क्रीडा आणि समाजसेवेमध्ये त्यांना प्रचंड आवड होती. कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने सामाजिक कार्याचे धडे वडिलांकडून आपोआपच मिळाले.

स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवून, उठो, जागो, और लक्ष प्राप्ती तक रुको मत या शिकवणीतून प्रेरणा घेत समीर कदम समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले. भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे तसेच भाजप नेतेबाळासाहेब पाटील आणि विनोद तावडे हे समीर कदम यांचे राजकीय गुरु होते.१९९८ साली राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन १९९८ साली राजकारणात प्रवेश केला. २२ व्या वर्षी समीर कदम यांनी निवडणूक लढवली आणि २००३ साली धानसर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आणि उपसरपंच पदाची देखील धुरा सांभाळली. २००८ साली पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक जिंकून उपसरपंच पदाची धुरा सांभाळली. धरणा कॅम्प, धानसर गावाच्या विकासासाठी समीर कदम यांनी प्रामाणिक योगदान दिले.

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत खारघर प्रभाग क्रमांक ६ मधून धर्मपत्नी संजना कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. समीर कदम यांच्या सर्वसमावेशक कार्यामुळेच जनतेने आपला हक्काचा लोकप्रतिनिधी पनवेल मनपाच्या सभागृहात जिंकून पाठविले. मागील चार वर्षात समीर कदम आणि नगरसेविका संजना कदम यांनी विभागातील अनेक लोकाभिमुख कामांना पूर्णत्वास नेले आहे. विविध संस्थांवर कार्यरत असताना सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमातून खारघर विभागात सामाजिक एकात्मता कायम अबाधित ठेवली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे रायगड जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी संभातानं खारघर विभागात पक्ष वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला. टोल विरोधातील आंदोलन , प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठीचे आंदोलन,वीज दरवाढीविरोधातील आंदोलन, पाणी प्रश्नाविरोधात आंदोलन अशा अनेक लोकन्यायाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. समीर कदम यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

धर्मपत्नी तथा पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका संजना समीर कदम यांच्या सोबत भाजपनेते समीर कदम
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »