नवी मुंबई : संपूर्ण देशात ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एस एस हायस्कूल नेरुळ आणि कच्छ युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने टाक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नेरुळ येथील एस एस हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात शिक्षकांसह पालक आणि नेरुळ विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी एस एस हायस्कूलचे अध्यक्ष कमलेश पटेल, कच्छ युवक संघाचे चंद्रकांत देढिया, राहुल देढिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश साळुंखे, महावीर इंटरनॅशनल नवी मुंबईचे सेक्रेटरी नरेश संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या कोरोनामुळे जागतिक महामारी सुरु आहे. आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे. देश आणि समाजाप्रती आपली जबाबदारी व दायित्व म्हणून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची प्रतिक्रिया यावेळी एस एस हायस्कूलचे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी व्यक्त केली. रक्तदान करून या कठीण काळात कोव्हिडविरोधातील लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन कमलेश पटेल यांनी यावेळी नवी मुंबईकरांना केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एस एस हायस्कूलमध्ये रक्तदान शिबीर संपन्न !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




