समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव
विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
पनवेल (प्रतिनिधी) समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर पनवेलमधील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी शुभेच्छांसाठी गर्दी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राज्याचे कार्यकुशल लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री भरतशेठ गोगावले, भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार महेश बालदी, आमदार किसन कथोरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेंद्र थोरवे, सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, प्रशासकीय, विधी, पत्रकारिता, वैद्यकीय, संगीत, नाट्य, सामाजिक संस्था, संघटना, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिष्टचिंतन केले. या वर्षीही वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले. जनआरोग्य शिबीर, महारोजगार मेळावा, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला सक्षमीकरण कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. महापौर नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने “ऋतू हिरवा” विशेष संगीतमय कार्यक्रम, के. एन. गुजर हॉस्पिटलच्या वतीने कराड येथे आरोग्य तपासणी, रक्तदान, नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका व विदुषी शुभदा पराडकर यांचे मार्गदर्शन, जयेंद्रशेठ जोशी युवा मंच आणि रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम,नगरसेविका दर्शना भोईर यांच्या संयोजनाखाली व्हिजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या सहकार्याने ‘देवाभाऊ चष्मा’ या विशेष उपक्रमांतर्गत “गरजू तिथे चष्मा आणि मोतीबिंदू निवारण” जनआरोग्य शिबीर, नगरसेवक रविंद्र भगत यांच्यावतीने कळंबोलीत आरोग्य शिबीर, आभा व आयुष्यमान कार्ड, विद्यार्थ्यांचा सत्कार व वही वाटप, तसेच विकासकामांचे उदघाटन, नगरसेवक विजय खानावकर यांच्यावतीने कळंबोलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप, नागरिकांसाठी नेत्र तपासणी व चष्मे वाटप, तसेच हायमास्ट दिव्यांचे उदघाटन, शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक, नगरसेविका सायली सरक व शिवसेना कळंबोली शहराच्या वतीने वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यावतीने एनसीएमसी कार्ड शिबीर, आरपीआयचे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्यावतीने पॅनकार्ड व आधार कार्ड शिबीर, नगरसेवक गणेश कडू यांच्यावतीने पनवेल महापालिकेच्या व इतर शाळांना थोर समाजसुधारक यांच्या जीवनावरील २ हजार पुस्तके वाटप कार्यक्रम, मेसर्स एस.पी. घरत कन्ट्रक्शन व काळुंद्रे भाजपच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, प्रभाग १९ भाजपच्यावतीने स्वच्छता मोहीम तसेच वृक्षारोपण, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप अशी विविध सामाजिक उपक्रमे आयोजित करण्यात आली. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासात्मक दृष्टिकोन, समाजाभिमुख उपक्रम आणि लोकसहभागाला दिलेले प्राधान्य सातत्याने महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा विकासात रूपांतर झाला. त्या अनुषंगाने पनवेल परिसरातील शहरी तसेच ग्रामीण विकासाला नवे परिमाण प्राप्त झाले आहे. सर्वसामान्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठीची त्यांची तळमळ, तसेच प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ते करत असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, ही जनतेप्रती असलेली त्यांची निष्ठा अधोरेखित करणारी बाब आहे. विकासकामांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे, विविध विकासकामांचा नियमित आढावा घेणे आणि प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करणे, यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांची ओळख एक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि जनतेशी सदैव जोडलेला लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अत्यंत धावपळीची दिनचर्या असूनही मतदारसंघातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव उपलब्ध राहण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. विकासाची दूरदृष्टी, जनसेवेची तळमळ आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य प्रेरणादायी असल्याने आज वाढदिवसादिनी महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला.







Если вы хотите наждачка, наш интернет магазин предлагает большой выбор и выгодные цены.
Обратите внимание на гарантийные обязательства и правила комплектации заказа в выбранном магазине.
Чтобы избежать последствий и обеспечить безопасное восстановление организма, важно своевременно обратиться за профессиональной медицинской помощью. В клинике «Стоп-синдром» работает круглосуточная служба выезда нарколога на дом, что позволяет получить срочное лечение в комфортных условиях без госпитализации.
Ознакомиться с деталями – нарколог на дом круглосуточно цены иркутск