पनवेल : नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होत असल्याकारणाने पनवेल महानगरपालिकेच्या कर संकलनात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काल २६ जुलै रोजी एकाच दिवशी तब्बल १ कोटी ५६ लाख ५३ हजार ८८६ रुपयांचे कर संकलन झाले. आत्तापर्यंत एकुण २२ कोटी २६ लाख ७० हजार ६२७ रूपयांचे कर संकलन झाले असून नागरिकांचा कर भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे ३१ मार्च २०२३ च्या ऐवजी ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या कालावधीमध्ये कोणतीही शास्ती ,दंड, व्याज आकारण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
पनेवल महानगरपालिकेने सुधारीत मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली आहे. गेले काही दिवसापासून खारघरमध्ये मालमत्ता करांवर प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सुनावण्या घेण्यात येत होत्या. गेल्या शुक्रवारी( 23 जुलै) या सुनावण्या पुर्ण झाल्या असून या वेळी नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न पालिकेच्यावतीने करण्यात आला .
तसेच गेल्या शनिवार, रविवार सुट्ट्यांच्या दिवशी खारघर मधील उन्नती को ऑपरेटिव्ह सोसायटी,प्लॉट नं ६९ , शहा आर्केड, गॅलेक्सी अपार्टमेंट, सेक्टर ३५ याठिकाणी नागरिकांच्या मालमत्ता करासंदर्भात बैठका घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या नावामध्ये,पत्त्यामध्ये, सोसायटीच्या नावात,सदनिका नंबर यामध्ये त्वरीत दुरूस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मालमत्ता कर योग्य असल्याबद्दलची खात्री त्यांना पटतअसल्याने मालमत्ता भरणामध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
३१ जुलै पर्यंत मालमत्ता करांवर सूट असल्याकारणाने नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ता कर भरावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

पनवेलमध्ये एकाच दिवशी दीड कोटीच्यावर कर संकलन ! नागरिकांनी वेळेत कर भरावा : आयुक्त गणेश देशमुख !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




