नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या साधारणत: १५ लाख असून त्यामध्ये १३ लाख ६ हजार ५१७ कोव्हीड टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड टेस्ट करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रभागी आहे.
कोव्हीडच्या दुस-या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत असून कोरोना रुग्णांचे दैनंदिन बाधीत प्रमाण स्थिर होताना दिसत आहे. अशावेळी संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड टेस्टींगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली असून टारगेटेड टेस्टींगवर भर दिलेला आहे. याव्दारे ज्या इमारतीत कोव्हीड पॉझिटीव्ह रुग्ण सापडतो त्या इमारतीतील सर्व नागरिकांचे टेस्टींग करण्यात येत आहे. याशिवाय एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स, मार्केट अशा वर्दळीच्या ठिकाणीही टेस्टींग वाढीवर भर देण्यात आलेला आहे.
सध्या दररोज ७ हजारहून अधिक नागरिकांची कोव्हीड टेस्टींग केली जात असून मागील १५ दिवसात ९९ हजार ८५६ म्हणजे साधारणत: १ लाख नागरिकांची कोव्हीड टेस्टींग करण्यात आलेली आहे.
कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट जितकी उशीरा येईल तितकी हानी कमी होईल हे लक्षात घेऊन तिस-या लाटेचा प्रादुर्भाव विलंबाने सुरु होण्याकरिता कोव्हीड विषाणूला आहे त्याच ठिकाणी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता रुग्णशोधावर लक्ष केंद्रीत करून हॉटस्पॉट एरीयामध्ये टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. एखाद्या इमारतीमध्ये एक रूग्ण जरी आढळला तरी ती इमारत हॉटस्पॉट जाहीर करून इतर रहिवाशांमध्ये कोव्हीडचा प्रसार होऊ नये याकरिता इमारतीमधील प्रत्येक नागरिकाचे टेस्टींग करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीडचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी अगदी सुरुवातीपासून नियोजनबध्द पावले उचलण्यात येत असून सद्यस्थितीत कोव्हीडच्या तिस-या लाटेला अधिक काळ रोखण्यासाठी कोव्हीड टेस्टींगमध्ये करण्यात आलेली टारगेटेड वाढ हा देखील त्याच उपाययोजनांचा महत्वाचा भाग आहे याची जाणीव ठेवून समस्त नवी मुंबईकर नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ राखणे या कोव्हीड सुरक्षा त्रिसूत्रीचा नियमित अंगीकार करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

कोव्हीड टेस्टींगमध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रेसर !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




