पनवेल : कोरोना काळ असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेने करांमध्ये सवलत देण्याचे सोडून अन्यायकारक रित्या वाढ केलेली आहे याविरुद्ध आज खांदा कॉलनी रहिवासीयांनी एकत्र येत निषेध नोंदवला. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स न भरण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले आणि जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही , शेकाप नागरिकांच्या पाठीशी भक्कम पणे आहे असे सांगितले.
पनवेल महानगर पालिकेने आतापर्यंत फक्त कचराच सिडकोकडून हस्तांतरित करून घेतलेला आहे आणि त्यातही मोठा भ्रष्टाचार कचरा उचलण्याचे टेंडर मध्ये केलेला आहे असे असताना सुद्धा महानगरपालिका अन्यायकारक रित्या टॅक्स लावत आहे असे शेकाप नेते वाघमारे यांनी लोकांच्या निदर्शनास आणले. आता तरी सत्ताधाऱ्यांनी जागे होऊन सर्वसामान्य नागरिकावर लावलेला अन्यायकारक मालमत्ता कर रद्द करून, दुहेरी कराच्या विरुद्ध योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा खांदा कॉलनी येथील रहिवासीयांच्या बैठकीत मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी व्यक्त केली. पनवेल महानगरपालिकेने सर्वप्रथम खांदा कॉलनी करांना योग्य त्या आरोग्य सेवा पुरवाव्यात जेणेकरून कोरोना चे रुग्ण वाढणार नाहीत त्यासाठी प्राधान्य द्यावे त्यानंतर इतर सुविधा पुरवाव्यात त्यानंतरच कर लावावा अशी अपेक्षा शेकाप नेते अनिल बंडगर यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका सौ सारिका भगत , माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे , सचिव महेंद्र कांबळे ,शेकाप युवा नेते अतुल भगत ,मंगेश अपराज , शेकडो नागरिक आणि सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अन्यायकारक कराच्या विरुद्ध खांदा कॉलनीकरांची वज्रमूठ ! विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे मार्गदर्शन !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




