नवी मुंबई : सिवुड्स – दारावे प्रभाग क्रमांक ९२ आणि ९९ मधील नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात , अशी मागणी नगरसेवक सुनील पाटील यांनी नवी मुंबई मनपाचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
लोकनेते तथा आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी नवी मुंबईतील विविध नागरी समस्यांबाबत आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी नगरसेवक सुनील पाटील यांनी आपल्या विभागातील विविध प्रश्न मांडले व तातडीने सोडविण्याची मागणी केली. सिवुड्स- दारावे ९२ आणि ९९ मधील उद्यान, पदपथ , गटारे ,विद्युतविषयक अनेक समस्या मांडल्या. वीज कंपनी संदर्भात अनेक प्रश्न मांडले. सिवुड्स – दारावेमध्ये विजेचा लपंडाव नेहमी सुरु असतो. याबाबत वीज कंपनीची समन्व्य साधून येथील प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सुनील पाटील यांनी केली आहे.

सिवुड्स- दारावेमधील नागरी समस्या तातडीने सोडवा ! नगरसेवक सुनील पाटील यांची मागणी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




