नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : लॉक डाउन काळात वीज कंपनीने पाठवलेल्या बेसुमार वीज बिलांनी जनता पुरती पोळून निघाली असून राज्य शासनाने वाढवी पाठवलेली वीज बिले तात्काळ रद्द करावीत, या मागणीसाठी गुरुवारी नवी मुंबई मनसेच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनजवळ झटका आंदोलन केले. या आंदोलनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील जण आक्रोश रस्त्यावर आला.
मनसेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे आणि मनसेच्या नवी मुंबईत महिला अध्यक्षा डॉ आरती धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सदर भव्य जण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि नवी मुंबईकर जनता देखील सहभागी झाली होती.
सरकारने वाढीव बिलांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशे मागणी सरकारकडे केली असल्याचे डॉ आरती धुमाळ यांनी यावेळी सांगितले. आजचे आंदोलन म्हणजे राज्य सरकारच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी मनसेचे झटका आंदोलन असल्याचे आरती धुमाळ म्हणाल्या.
कोकण दर्पण.





