Press "Enter" to skip to content

अन्यथा, छावण्यांचे स्वरूप येईल – रायगड मनसेचा सरकारला इशारा !

वीज बिलं कमी करा -मनसे

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : एकीकडे भरमसाठ वीज बिलं पाठवायची आणि दुसरीकडे त्याविरोधात आवाज उठवला तर आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा, हि राज्यसरकारची नीती जनता खपवून घेणार नाही, सरकारने वेळीच जागे होऊन वीज बिले कमी करावीत, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी छावणीचे सवरून येईल, असा आक्रमक इशारा रायगड जिल्हा मनसेच्या वतीने मंगळवारी देण्यात आला.
वाढीव वीज बिलाविरोधात रायगड जिल्हा मनसेच्या वतीने पनवेल येथील शिवाजी चौक येथे जनआंदोलन करण्यात आले. त्यावेळी मनसेने आक्रमक भूमिका घेतली. वाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय दरम्यान मोर्चा काढून महावितरणाचा निषेध केला. यावेळी रायगड जिल्हाअध्यक्ष अतुल भगत , जिल्हा सरचिटणीस केशरीनाथ पाटील, मनसेचे नेते ऍड अक्षय काशीद, खारघर शहरब अध्यक्ष प्रसाद पाटील, तसेच अन्य पदाधीकारी व मनसेचे शेकडो कार्यकर्ते , रहिवाशी उपस्थित होते. यावेळी मनसेच्या वतीने पनवेल तहसीलदारांना वीज बिलं कमी करण्याचे मागणीचे निवेदन देण्यात आले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »