नवी मुंबई, कोकण दर्पण : लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीज बिल पाठवून वीज कंपनीने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली गेली. खऱ्या अर्थाने सरकारने केलेली जनतेची हि फसवणूक आहे , असा आक्रमक पवित्रा घेत नवी मुंबई भाजपच्या वतीने बुधवारी सीबीडी येथील महावितरण कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात आले. लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीज बिल कमी करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सी बी डी भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत जनतेला पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. वीज बिलामध्ये सवलत देण्याची घोषणा करूनही सवलत देण्यात आली नाही. त्यामुळे जनतेच्या भावना आक्रमक असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ नगरसेवक अशोक गुरखे आणि माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांनी व्यक्त केली. यावेळी जेष्ठ नगरसेवक डॉ जे के नाथ , युवानेते तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी , कार्यकर्ते व रहिवाशी उपस्थित होते.
कोकण दर्पण :





