Press "Enter" to skip to content

देशातील गंभीर प्रश्नावरून भाजप जनतेला भरकवटतेय – खा. इम्तियाज जलील !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : देशात आता गंभीर प्रश्न उभे असताना त्यावरुन जनतेचे लक्ष भरकटवण्या साठी भाजप, आर एस एस बजरंग दल एक सुनीयोजित कट रचून देशात हिंदू,मुस्लिम असे धार्मिक प्रश्न निर्माण करून जमतेचे लक्ष विचलित करन्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र देशातील जनता आता मूर्ख नसून सुज्ञ बनत चालली आहे.त्यामुळे भाजप च्या असल्या भूलथापांना यापुढें बळी पडणार नाही असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले. ए आय एम आय एम प्रणित विद्यार्थी आघाडीचा प्रथम वर्धापन दिनानिमीत्त नवी मुंबई कामोठ मध्ये प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.मागील पाच वर्षे राज्यात भाजप चे सरकार होते मात्र तेव्हा यांना मदरसे बंद करावेसे नाही वाटले आणि आता सत्ता नाही तर राज्यातील मदरसे बंद करा असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.त्यामुळे भाजप मूळ मुद्दे सोडुन दुसऱ्याच मुद्द्याना हाथ घालत आहे.आणि असे आहे तर केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे त्यांनी मदरसे बंद करुन दाखवून द्यावे. नाहक नागरीकांचे लक्ष विचलित करू नये असे देखील जलील यांनी सूनावले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वारीस पठाण,फैयाज अहमद,महासचिव शाहनवाज खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.कुणाल खरात, प्रभाकर पारधे, शहजाद खान, प्रशांत वाघमारे, रुमान राझवी,सानीर सय्यद,मझर पठाण आदी मान्यवर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधीकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »