Press "Enter" to skip to content

भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी बीना गोगरी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारत रक्षा मंचच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षपदी नवी मुंबई मधील सामाजिक ,राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बीना गोगरी यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच भारत रक्षा मंचची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक भोपाळ या ठिकाणी पार पडली. यावेळी बीना गोगरी यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे .
भोपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत भारत रक्ष मंचचे राष्ट्रीय संगठन मंत्री सूर्यकांत केळकर ,राष्ट्रीय अध्यक्ष रघुनंदन शर्मा आदींसह राष्ट्रीय संगठन समितीचे सदस्य व विविध राज्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. २०१० साली ‘बांग्लादेशी घुसपैठ’ या समस्ये वर कार्यरत झालेले भारत रक्षा मंच हे
प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे राष्ट्रव्यापी संघटन आहे. देशात 24 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात या संघटनेचा विस्तार आहे. बीना गोगरी यांच्यासह प्रशांत कोतवाल यांची राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व पांडुरंग नाईक यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातून एकूण ३ पदाधिकाऱ्यांचा भारत रक्षा मंचच्या केन्द्रीय समितीत समावेश करण्यात आला आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »