पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निर्बंधामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर उपास्मारिची वेळ आली. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मोफत अन्नधान्य देऊ केले. मात्र , खारघरमध्ये सरकारची योजना काही ठिकाणी पोहचली नव्हती. अशा परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेऊन सुमारे ५०० कुटुंबाना सरकारी योजनेचा लाभ मिळवून दिला. सरकारची योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्याला यश आले, गरजूंना आधार मिळाला, याचे आम्हांला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण देशात सर्वसाधारण कुटुंबाचे, मजुरांचे खुप हाल होत आहेत. त्यांची काम रोजगार बंद आहे. म्हणुन सरकारने मोफत धान्य देऊ केले.पण ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. राष्ट्रवादी खारघर शहर अध्यक्षा राजश्री यांच्याकडे अनेकांनी याबाबत व्यथा मांडली.
आम्ही खायचे काय, असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. तदनंतर राजश्री कदम यांनी सदर योजनेचा अभयास करून पाठपुरावा केला. पनवेल तहसील कार्यालयात गरजूंची यादी पाठवून मोफत धान्य वाटपाची योजना खारघरमध्ये आणली. यासाठी अनेकांनी सहकार्य केल्याची माहिती राजश्री कदम यांनी दिली. खारघर कोपरागाव येथील रेशनींग दुकानदार भूषण खत्रे यांनी विशेष सहयोग दिला.
राष्ट्रवादी काॅग्रेस खारघर शहर अध्यक्ष राजश्र कदम, शहर अध्यक्ष बळीराम नेटके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शितोळे देशमुख, आमोल शिंदे ,समाज सेवक :महेशकुमार राऊत, शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत जांभुळकर, शेकापच्या कल्पना खरे आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.
कोकण दर्पण.





