पनवेल(प्रतिनिधी) रसायनी परिसरातील नागरिकांना कायम मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली गुळसुंदे येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस गटविकास अधिकारी श्री. तेटगुरे, पाणी पुरवठा अधिकारी श्री. चव्हाण, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिचंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, माजी सरपंच आर. डी. पाटील, माजी उपसरपंच यशवंत जाधव, सदस्य मनोज पवार, सदस्या प्रभावती कार्लेकर, उपासना गोठळ यांच्यासह इतर सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. गुळसुंदे, लाडिवली, आकुळवाडी, तुराडे, कष्टकरीनगर, वावेघर, सावळे, देवळोली, दापिवली व परिसरातील इतर गावांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे यासाठी आमदार महेश बालदी यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने या गावांना परिसरातील कोणत्या जलस्त्रोतातून पाणी मिळविता येईल व त्यासाठी उपाययोजना करण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यानुसार येत्या काही दिवसांतच पंचायत समितीचे अधिकारी या संदर्भात अहवाल देणार असून मुबलक व नियमित पाणी पुरवठ्यासाठी कार्यवाही होणार आहे.

नियमित व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी आमदार महेश बालदी यांचा पुढाकार
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ




