शहरं आजारी पडणं हि सामाजिक समस्या बनलीय – डॉ अभय शेटे !
दैनंदिन जीवनातील मानसिक तणाव आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करत असतो. शारीरिक आरोग्याचे मूळ तेच आहे, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे, असे मत अमेय हॉस्पिटलचे वैधकीय संचालक डॉ अभय शेटे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केले.
आजची जीवन पद्धती अगदी गतिमान झाली आहे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढतंय. अशा परिस्थितीत आजारपणाचे प्रमाण वाढत आहे. जणू शहराला आजारपणाची सवय लागली आहे कि काय अशी शंका येते. त्याचे मूळ कारण आहे, शहरात राहणाऱ्या व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर होतो आहे. आणि त्यातूनच शहरीरीक रोग बळावत आहे. शहरातील आरोग्य बिघडतंय का ? शहर आजारी का पडतायत ,याबाबत आपण गांभीर्याने विचार करायला हवा. खरतर शहर आजारी पडणे हि एक सामाजिक समस्या आहे, असे मत डॉ अभय शेटे यांनी व्यक्त केले.
शहरतील व्यक्ती आजारी पडायला सर्वात पहिले कारण म्हणजे त्याच्या सवयी आणि त्याचा आहार आहे. रोजच्या व्यवहारात तो इतका व्यस्त झाला आहे कि त्याला कि त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. दररोजची जीवघेणी धावपळीत तो इतका फसला आहे , कि त्याला आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपण कमावतो जगण्यासाठी , पण जगायला चांगले खाल्ले पाहिजे, याचा विचार केला जात नाही. कस तरी काहीतरी खाऊन दिवस ढकलायचा अशी मानसिकता आज शहरात झालेली दिसते. याचा मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. चांगले शरीर , चांगले आरोग्य राखायला दररोज व्यायाम करायला पाहिजे. नियमित व्यायाम नाही तर किमान आपण दररोज चाललं पाहिजे. मात्र शहरात राहणाऱ्या व्यक्तीला तेवढा देखील वेळ नाही. वाढते शहरीकरण आणि प्रदूषण याचा फटका शहरातील आरोग्यतावर शहरातील आरोग्यावर होऊन आजारपणाचे प्रमाण वाढत आहेत. अनेक साथीच्या रोगांना शहर बळी पडत आहेत. शहरात राहणार माणूस मानसिक दृष्टया कमजोर झालेला दिसतो. आपण शारीरिक आजारी पडतो मात्र त्याचा मानसिक आजारच त्याला अर्ध्याहून अधिक त्रस्त करून सोडतो. शारीरिक आजार लवकर बरा होण्यासाठी आपलं मानसिक आरोग्य , आपले मनोबल अधिक बळकट असायला पाहिजे.
आपण आजारी पडतो , उपचार घेण्यासाठी डॉक्तरकडे जातो. आपल्याला डॉकटर काय करतो , त्याच्यावर औषध देतो , आजार गंभीर असेल तर शस्त्रक्रिया करतो. पण आपण यातून पूर्ण बरे झालेलो असतो का ? तर नाही . आपल्या शरीरात मोडतोड करून ते दुरुस्त केले जाते. आपले शरीर कमजोर होते. त्यामुळे प्रथमतः आपण हे टाळण्यासाठी आपण आजारीच पडू नये , यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. आरोग्य , आपले शरीर हि अनमोल आणि एकमेव संपत्ती आहे , ती सुदृढ ठेवण्यासाठी यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. तरच सामाजिक स्वास्थ टिकेल आणि वाढेल , असे डॉ अभय शेटे यांनी शेवटी नमूद केले.
कोकण दर्पण .





