Press "Enter" to skip to content

सक्षम पिढी घडविणारे शिक्षण हवे – कमलेश पटेल !

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आज घडणारी नवी पिढी सुज्ञ आणि सक्षम हवी. शिक्षणातून नुसते पाठयक्रम नकोत तर सर्वार्थाने सक्षम नवी पिढी घडविणारे शिक्षण विध्यार्थ्यांना द्यायला हवे. शिक्षणाची केंद्रे चालविणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि शाळांनी हे समजून घेतले पाहिजे.

आज गतिमानतेने शैक्षणिक बदल होताना दिसत आहेत. नव्या अभ्यासाचे , नव्या पद्धतीचे आणि नव्या आव्हानाचे जणू डोंगर विद्यार्थ्यांपुढे उभे ठाकले आहेत. पण या स्पर्धेला सामारे जाताना आपण विध्यार्थ्यांना कोणत्या दिशेने नेत आहोत, हे पाहणे गरजेचे आहे. उत्तम शिक्षण आणि त्यासोबत चांगले संस्कार जर शाळेत मिळाले तर नक्की एक सुसंस्कारी पिढी घडेल. आयुष्याचा अचूक वेध घेऊन ध्येय गाठण्यासाठी विध्यार्थ्यांना तयार केले तर एक यशस्वी पिढी निर्माण होईल. एक यशस्वी आणि सक्षम पिढीचं देशाला चांगलं भविष्य देऊ शकते, त्यासाठी चांगले विध्यार्थी घडविणायची जबाबदारी शाळांची आहे, असे एस एस हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन कमलेश पटेल यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केले.

पुस्तकांचे ओझे वाढले म्हणजे विध्यार्थ्यांना जास्त ज्ञान मिळाले असे होत नाही. त्यासाठी शिक्षणाचे अचूक नियोजन व्हायला हवे. पुस्तकासोबत जगाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विध्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. स्पर्धेसाठी विध्यार्थ्यांना आरंभीपासूनच तयार केले पाहिजे असे देखील कमलेश पटेल यांनी यावेळी नमूद केले.आज प्रत्येक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेसाठी विध्यार्थ्यांना आतापासूनच तयार केले पाहिजे. आपल्या पाल्याचे , आपल्या विद्यार्थ्यांचे ध्येय काय आहे, पालकांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी ओळखले पाहिजे आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्यांना दिशा दिली पाहिजे.

आधुनिक शिक्षणाची जोड दिली पाहिजे. साहजिकच, आधुनिक शिक्षण म्हणजे संगणक आणि मोबाईल यंत्राचा वापर आला. परंतु तो वापर किती आणि कसा करावा हे शास्त्र देखील समजून घेतले पाहिजे. हि जबाबदारी मुळातच पालकांची आहे. मात्र पालक या जबाबदारीपासून दूर जातोय का अशी शंका येते. आपल्या पाल्यांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल ठेवून आपल्या कामासाठी मोकळे झाल्याचे समाधान मानणारे अनेक पालक आहेत. यातून विध्यार्थ्यांना आपण न कळत आजारपणाकडे नेतोय , हि गंभीर बाब आपण समजून घेतली पाहिजे. देशाच्या उद्याच्या उज्वल भविष्यासाठी एक उत्तम पिढी निर्माण करूया.हि आपली सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी आहे.

संजना महाडिक .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »