उरण, कोकण दर्पण वृत्तसेवा : शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना उरणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चार वेळा संधी दिली.तसेच २०१४ च्या निवडणूकीत उरणचा आमदार म्हणून मनोहर भोईर यांना उरणकरांनी संधी दिली.परंतू या आजी,माजी आमदारांनी उरणच सोन करण्याऐवजी माती केली.म्हणून मी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर मैदानात उतरलो आहे.तरी २१ व्या शतकातील विकसित उरण विधानसभा बनविण्यासाठी आपण सज्ज होऊ या अशी हाक उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी उरणकरांना दिली आहे.
उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ उरण शहर येथे जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी (दि. १८) करण्यात आले होते. या सभेसाठी मैदान उरणकरांनी खचाखच भरले होते. यावेळी महेश बालदी यांनी पुढे सांगितले की, ४०० कोटीची बेंक बुडवू पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे जेलमध्ये जाणार आहेत. ते काय तूमचा आमचा विकास करणार आहेत.तसेच उरण मधिल एखाद्या भूमिपूजन किंवा उदघाट्न कार्यक्रमासाठी न येणारे उध्दवजी ठाकरे मात्र माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला हलविण्यासाठी उरणात येत असतील तर तो माझा निश्चित विजय आहे. त्यामुळे अब की बार १ लाख पार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठने गरजेचे आहे.
येथील आमदार हे उरणकरांना आश्र्वासना पलीकडे काहीच देत नाहीत.आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ५०० कोटींची कामे मार्गी लावली. हे पुस्तकाच्या माध्यमातून उरणकरांसमोर मांडलं आहे. ७० वर्षं ज्याना घारापुरी बेटावर लाईट देता आली नाही ते काय विकास करणार,मात्र ते भाजपाने करून दाखवले, शिव-समर्थ स्मारक का बांधल असे विचारणारे हे कोण असा सवाल बालदी यांनी विरोधकांना केला.जे केले नाही त्याचे श्रेय आम्ही घेत नाही.परंतू येथील सेफ्टी झोनचा प्रश्न,रेल्वेचा, रुग्णालयाचा, झोपडपट्टी धारकांचा घरकुलाचा प्रश्न तसेच इतर अनेक जनहिताचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागणार आहोत.त्यासाठी उरणकरांचा आशिर्वाद माझ्या साठी महत्त्वाचा आहे. मी उरणमध्ये जन्मलो, जिल्हा परिषदेच्या शाळेत माझे शिक्षण झाले येथे मी लहानाचा मोठा झालो, हि माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे या मातीशी कायम इमान राखणार आहे. आपण २१ व्या शतकातील विकसित उरण बनविण्यासाठी आणि २४ तारखेला शिव समर्थ स्मारकाजवळ गुलाल उधळण्यासाठी सज्ज होऊ या असे आवाहन शेवटी महेश बालदी यांनी केले.
या कर्मभूमीशी इनामी इतबारे सेवा करण्याचे काम महेश बालदी यांनी सुरू केले आहे.त्यामुळे कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या आज महेश बालदी यांना आपला पाठिंबा जाहीर करते,जे आजी माजी आमदारांना जमलं नाही ते महेश बालदी यांनी या पाच वर्षांत करून दाखवले आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्ताचे दिवंगत नेते दि.बा.पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे यांचे अधुरे राहिलेलं केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातील प्रश्न तसेच तरूणांचा रोजगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण महेश बालदी यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू या असे आवाहन दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या श्वूती म्हात्रे यांनी उपस्थितांना केले.
समर्थांचे सेवक हे महेश बालदी आहेत. हे त्यांनी सुरू केलेल्या जनसेवा हीच ईश्वर सेवेच्या माध्यमातून तसेच जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून उभारलेल्या शिव समर्थ स्मारकाच्या साक्षीने दाखवून दिले आहे.त्यामुळे हतबल झालेले विरोधक महेश बालदी यांच्या बदल गैरसमज निर्माण करत आहेत.परंतू या मतदारसंघाचा खराखुरा विकास हे महेश बालदी करू शकतात हे आपण त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. आज जी शिवसेना आपण पाहत आहात ती शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नाही.ती लाचार झालेल्या पदाधिकाऱ्यांची आहे.तरी महेश बालदी यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डोळ्यात तेल घालून कामाला लागने गरजेचे आहे, असे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी नमूद केले.
यावेळी सोनारी, बोरी उरण सह इतर गावातील अनेक शिवसेना, शेकापक्षाचे कार्यकर्ते यांनी महेश बालदी यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेऊन भाजपा पक्षात प्रवेश केला.तसेच नाभिक महिला संघाच्या अध्यक्षा दिपाली शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने महेश बालदी यांना पाठिंबा दिला. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, राजाशेठ पडते, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, तालूकाध्यक्ष रविशेठ भोईर, के. ए. म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, संजय गायकवाड, युवा नेते तथा महालण विभागाचे अध्यक्ष महेश कडू, निळकंठ घरत, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शेखर तांडेल, सुरेश पाटील,दौलतशेठ घरत, भुपेंद्र घरत, संगीता पाटील, संपदा म्हात्रे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, संदानंद गायकवाड, अनंत गायकवाड, चिंतामण गायकवाड, सरपंच दामूशेठ घरत, भूपेन घरत, पंडित घरत, देवेंद्र पाटील,विकी पाटील, शहराध्यक्ष कौशिक शहा, कामगार नेते जितेंद्र घरत,माजी नगराध्यक्ष नितिन पाटील, कुलदीप नाईक, दिनेश तांडेल,प्रकाश कडू,रेखा पाटील,दर्शन घरत, सूनिल पाटील, नरेश म्हात्रे,सरपंच निशान घरत, अँड पराग म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका स्नेहल कासारे,यास्मीन फाईक गॅस, हेमंत म्हात्रे,समिर मढवी,प्रल्हाद पाटील, सरपंच ज्योती परशुराम म्हात्रे, सरपंच कविता हरेश भोईर सह आजी माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकण दर्पण .





