Press "Enter" to skip to content

बेलापूर आणि ऐरोली मध्ये महाआघाडीचा विजय निश्चित- अनिल कौशिक यांचा विश्वास !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली हे दोन्ही गड आम्ही नक्की जिंकणार आहोत. दोन्ही मतदार संघात महाआघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.
बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदार संघात कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष महाआघाडीसाठी चांगले वातावरण आहे. बेलापूर विधानसभा मतदार संघात महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे आणि ऐरोली मधील उमेदवार गणेश शिंदे यांचा जोरदारप्रचार झालेला आहे. त्यामुळे विरोधकांना चांगलेच आव्हान आम्ही निर्माण केले आहे. नवी मुंबईतील विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही ही लढाई लढत आहोत, जनता नक्की महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी जिंकून देईल, असा विश्वास अनिल कौशिक यांनी व्यक्त केला.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »