Press "Enter" to skip to content

कर्जत – खोपोलीच्या विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात – हाजी अकरम खान !

कर्जत,कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्जत – खोपोली तालुका आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे , अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे कर्जत-खोपोली विधानसभा मतदार संघातील उमेदवार हाजी अकरम खान यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
मागील अनेक वर्षांपासून कर्जत – खोपोली तालुक्यातील विकास रखडलेला आहे. प्रस्थापित सत्ताधार्यांनी फक्त आश्वासने दिली मात्र विकासाला गती दिली नाही. कोंढाणे धरणाचा प्रश्न असो किव्हा कर्जत-पनवेल रेल्वेचा प्रश्न असो , माथेरान पर्यटन विकास असो किव्हा अत्याधुनिक हॉस्पिटलचा प्रश्न असो , रस्ते असोत किव्हा आदिवासी बांधवाना न्याय देणे असो ,असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेला फक्त आश्वासने दिली गेली आहेत. रखडलेला विकास सत्यात उतरविण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे खान यांनी नमूद केले.

कोकण दर्पण.

कोकण दर्पण.