कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नेवाळे गावातील एअर फिल्ड प्रश्नाचं काय होणार ? असा प्रश्न कल्याणकर विचारू लागले आहे. कल्याणमध्ये जर विमानतळ झाले असते तर कल्याणच्या विकासाला गती अली असती मात्र राजकारणाचा बळी ठरलेल्या कल्याणला अनेक प्रशानी घेरले. त्यातील चिघळला प्रश्न म्हणजे नेवाळे गावातील एअर फिल्डचा.
ठाणे जिह्यात ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले एकमेव कल्याण पूर्व मतदार संघात नेवाळे एअर फिल्ड आहे. नेव्हीच्या अखत्यारीत आहे. येथे एकमेव विमानतळ झाले असते . मात्र , तत्कालीन राजकर्णायनी विमानतळ नवी मुंबईत हलविले. त्यामुळे खुल्या झालेल्या मैदानात दिवा, मुंब्रा येथील काही बिल्डरांनी बेकायदा चाळी बांधल्या . बांधल्या. बिल्डरांनी दहा ते पंधरा हजार रुपयांना चाली विकल्या. अनके कुटुंब फसली. नेवाळे एअर फिल्ड मध्ये झालेल्या अतिक्रमणबाबत नेव्हीने उल्हासनगर, अंबरनाथ तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या .तेव्हापासून एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली. संघर्ष निर्माण झाला. रणकंदन माजले . प्रश्न चिघळला आहे. या राजकारणात स्थानिकांवर देखील गुन्हे दाखल झाले.अनेकांच्या कुटुंबात डोक्याचे संकट आले. हा प्रश्न रखडलेला आहे , हा प्रश्न खंबीरपणे कोण सोडविणार असा प्रश्न कल्याणकरांनी केला आहे.
कोकण दर्पण.





