Press "Enter" to skip to content

एमआयएमला ठाणे जिल्ह्यात हव्यात ६ जागा !

ठाणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या एमआयएमला ठाणे जिल्ह्यात ६ जागा हव्या आहेत. जागा वाटपात सहा जागा मिळाव्यात अशी मागणी एमआयएमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अयाज मौलवी यांनी केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व ,पश्चिम, मीरा भाईंदर, मुंब्रा कळवा, बेलापूर या मतदार संघांवर एमआयएमने दावा केला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय वंचितचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष आसुदुद्दीन ओवेसी घेणार आहेत. दरम्यान, एमआयएमच्या पारड्यात कोणत्या जागा जातील हे लवकरच स्पष्ट होईलच.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »