Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातील पालकत्व जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर !

ठाणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्ह्यातील पालकत्व आता माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी ठरवलेली दिशाच राष्ट्रवादीला उभारणीचा मार्ग दाखविणार आहे.

एकेकाळी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व होते. माजी मंत्री गणेश नाईक आणि दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या सारखे दिग्गज नेते राष्ट्रवादीत होते. त्यामुळे नवी मुंबई आणि ठाण्यात राष्ट्रवादीचा जोर होता . आता बदलत्या राजकीय भूकंपात राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपात गेले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने एकच दिग्गज नेता राहिला आहे. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याची मोठी जबाबदारी आव्हाड यांच्यावर आहे. जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यात अनेक मतदार संघ भाजप सेनेचे जिंकून घेतले आहेत. आता राष्ट्रवादीचे नेतेच भाजपात विलीन झाल्याने मुंब्रा कळवा आपल्या ताब्यात शाबूत राखण्याचे मोठे आव्हान जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »