समाजकारण असो अथवा राजकारण, आपली सक्रियता कायम ठेवूण आपली उपयुक्तता समाजाच्या कामी यावी म्हणून सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे कार्यकुशल नेतृत्व म्हणजे समीर श्रीकांत कदम होय. समीर कदम यांच्या आई – वडिलांचा संघर्ष मोठा आहे. संघर्षमय कुटुंबात घडणारी पिढी हि अधिक परिस्थितीची जाणीव राखून असते , साहजिकच समीर कदम यांच्यावर झालेले संस्कारात सामाजिक विचारांचे सिंचन होते. याविचारातूनच समीर कदम यांच्या सारखे उमदे आणि तरुण नेतृत्व निर्माण झाले.छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचा आदर्शबाळगून आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा राजकीय आदर्श घेऊन समीर कदम यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरु आहे.समीर कदम हे विविध संस्थांवर कार्यरत आहेत. भाजपा युवा मोर्च्याचे ते रायगड जिल्हा सरचिटणीस आहेत. कोयना क्षेत्रीय मराठा समाज सेवा संघाचे सदस्य आहेत.
समीर कदम यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेले कोयना गाव होय. कोयना धरण प्रकल्पामुळे १९५८ साली विस्थापित झालेली अनेक गावे महाराष्ट्र शासनाने इतरेतर प्रस्तापित केली. समीर कदम यांचे कुटुंब पनवेल तालुक्यातील तळोजाजवळील धरणाकॅम्प गावामध्ये वसविले. सुमारे ६० वर्षांपासून समीर कदम यांचे कुटुंब वास्तव्य करीत आहे. समीर कदम यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा धरणाकॅम्प येथे झाले तर माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कुल रोइंजन येथे झाले पुढे १२ वी पर्यंत शिक्षण पूण करून तीन वर्षांचा आयटीआय कोर्स पूर्ण केला. शिक्षण घेताना सामाजिक कार्य सुरु होतेच. वयाच्या २० व्या वर्षी समीर कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात सक्रिय प्रवेश घेतला. २२ व्या वर्षी निवडणूक लढविली. तळोजामधील धानसर ग्रामपंचायत मध्ये २००३ साली सदस्य म्हणून निवडून गेले. पुढे दोन वेळा उपसरपंच होण्याचा मान समीर कदम यांना मिळाला.
ग्रामपंचात सदस्य आणि उपसरपंच म्हणून समीर कदम यांनी अनेक विकास कामे केली. गावामध्ये स्मशानभूमी बांधणे , गणेशघाट बनविणे , रस्ते , दिवाबत्ती , शाळा बांधणे आदी विविध कामे पूर्णत्वास नेली. खारघर शहरात वास्तव्य करताना खारघर शहराच्या आणि विशेषतः खारघर प्रभाग क्रमांक ६ विकासासाठी समीर कदम यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सिडको प्रशासन , पनवेल महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विविध नागरीप्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
२०१७ मध्ये झालेल्या पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ६ मधून महिला आरक्षण पडल्याने समीर कदम यांनी त्यांची पत्नी संजना कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. अनेक वर्ष समीर कदम यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून निर्माण केलेला विश्वास सार्थकी लागला. प्रभाग ६ मधील जनतेने संजना कदम यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून पनवेल महापालिकेच्या सभागृहात पाठवले.
समीर कदम यांच्या खांद्याला खांदा लावून आता नगरसेविका संजना कदम देखील लोककार्यामध्ये सक्रिय झाल्याने जनसेवेचा रथ दुप्पट गतीने पुढे धावू लागला आहे. डीमार्ट जवळील वाहतुकीची आणि पार्किग समस्या सोडविण्यासाठी समीर कदम सातत्याने पाठपुरावा करत आहेत. कचरा समस्या , बस सुविधा , रस्ते, गटारे , नाले , दिवाबत्ती आदी प्रश्न सोडविले. प्रभाग ६ मधील वास्तुविहार , सेलिब्रेशन , घरकुल , स्पगेटी सोसायटीतील गॅस जोडणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.जनधन अंतर्गत २०० लोकांचे शून्य पैशात बँक खाते उघडून दिले, प्रत्येकी पाच वर्षांचा इन्शुरन्स करून देण्यात आला. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना काढून दिला. सिडकोच्या माध्यमातून शिर्के कंपनीकडून बनविल्या गेलेल्या वास्तुविहार व सेलिब्रेशन या प्रकल्पांमध्ये अनेक त्रुटी राहिल्याने त्याचा पाठपुरावा करून या सर्व घरांची दुरुस्ती त्याचप्रमाणे या सर्व घरांना नव्याने रंगरंगोटी करण्यासाठीचा सातत्याने पाठपुरावा करून त्या कामास शिर्के या कंपनीकडून सुरुवात करून घेतली.
सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी वास्तुविहार सोसायटीमध्ये सार्वजनिक गणेशॊत्सव , दहीहंडी , नवरात्रोतवस , छत्रपती शिवाजी महाराज जयंती , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी उत्सवांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय उत्सव मोठ्या आनंदाने साजरी केले जातात.
कोकण दर्पण.





