खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : शक्ति सन्मान महोत्सव या उपक्रमा अंतर्गत खारघर येथे ‘राखी पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा खारघर महिला मोर्चा सरचिटणीस बीना गोगरी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात १०४ महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना सद्भावना राखी पाठवली. शक्ति सन्मान महोत्सव या उपक्रमाच्या माध्यमातून भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा द्वारा संपूर्ण महाराष्ट्रातून २१ लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा निर्धार आहे.
या संकल्पने अंतर्गत ५ वर्षांच्या कार्यकाळात फडणवीस सरकार द्वारा राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सरकारने केलेल्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्रयाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला भगिनी देवेन्द्र फडणवीस यांना सद्भावना राखी पाठवत आहेत.भाजपा रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा कल्पनाताई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर सेक्टर १९ येथील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध जाती-धर्मांच्या व संघटनेच्या महिलांचा सहभाग लाभला.यात मुख्यत्वे संचयिनी महिला बचत गट, समृद्धी महिला बचत गट, जैन तेरापंथी महिला मंडळ, पतंजली योगपीठ,कर्नाटक संघम्,स्वरतरंग वृंद,के.के.पी.महिला मंडळ,स्त्री शक्ति फाऊंडेशन आदी महिला संघटनांनी सहभाग नोंदवला.त्याचप्रमाणे नर्मदाबेन चौटालिया,रेखा बावरी,पुष्पा गजरा,ममता गोयल,योगिनी गुंजाळ,माधुरी दाते इत्यादींनीही कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांना राखी पाठवली.
विशेष म्हणजे कार्यक्रम स्थळी सतिश हावरे दिव्यांग सेन्टरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.उपस्थित महिलांनी दिव्यांग मुलांनी बनविलेल्या राख्या विकत घेऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांना पाठविल्याने ह्या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची पण जोड मिळाली.पनवेल महानगरपालिका महिला-बालकल्याण सभापती व भाजपा खारघर महिला मोर्चा अध्यक्षा लीना गरड यांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन उपस्थित महिलांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास अन्जु आर्या, स्मिता आचार्य, वैशाली प्रजापति, चांदनी अवघडे, अल्पना डे, हंसा पारधी इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या आयोजिका बिना गोगरी यांनी उपस्थित महिलांचे आभार मानून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन भरघोस मतांनी विजयी करण्याचे व पनवेल विधानसभा क्षेत्रातून आमदार श्री प्रशांत ठाकुर यांना पुन्हा एकदा १ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले. उपस्थित महिलांनी भाजपा महिला मोर्च्याचे व बीना गोगरींचे आभार मानले व महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार स्थापन होऊन देवेन्द्र फडणवीसजीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून लाभणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कोकण दर्पण.





