Press "Enter" to skip to content

खारघर वाहतूक विभागाला नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या शिष्टमंडळाने दिली भेट ! शहरातील वाहतूक समस्येकडे वेधले लक्ष !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या शिष्टमंडळाने खारघर वाहतूक विभागाला भेट दिली. खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांच्याशी शहरातील वाहतूक समस्येबाबत चर्चा केली.
बालभारती शाळेकडून खारघर सेक्टर मध्ये येणाऱ्या रस्त्यावर सध्या मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.येथील सिग्नलची वेळ कमी असल्याने शाळेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहनांची मोठी कोंडी होते. त्यामुळे विध्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होते. येथील सिग्नलच्या वेळात वाढ करावी, अशी मागणी यावेळी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी केली. अनेकदा शाळेच्या आवारात आणि शाळेच्या गेट समोर स्कूल बसेस कशाही उभ्या केल्या जातात, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होते.त्यामुळे शाळांना याबाबत समज देऊन त्यांचा कर्मचारी नेमण्याच्या सूचना वाहतूक विभागाने शाळांना द्याव्यात , अशी मागणी देखील करण्यात आली. त्याव्यतिरिक्त वाहतूक समस्येबाबत इतर अनेक प्रश्नांवर नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि युवानेते अमर उपाध्याय यांनी खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांच्याशी चर्चा केली.
यावेळी भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्या , कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण दर्पण.