Press "Enter" to skip to content

संविधानिक भारताच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीला जिंकून आणा – एमआयएम नेते शाहनवाज खान यांचे यांचे आवाहन !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : संविधानिक भारताच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीला जिंकून आणा, असे आवाहन एमआयएमचे नेते शाहनवाज खान यांनी केले आहे. महाराष्ट्रातील बहुजन जनता या निवडणुकीत आपले हक्काचे उमेदवार निवडून आणून सत्तेच्या चाव्या आपणाकडे ठेवतील, असा विश्वास देखील खान यांनी व्यक्त केला.

आज देशावर मोठे संकट आहे. बेरोजगारी , महागाई वाढली आहे. जातीय राजकारणाला खतपाणी घालण्याचे काम काही धार्मिक व्यवस्था करीत आहे. भारत देशाच्या सार्वभौमत्वाला , अखंडतेला हा मोठा धोका आहे.

समता , स्वतंत्रता , बंधुता आणि न्यायावर आधारित भारत देशाची लोकशाही टिकून आहे. धर्माचे ठेकेदार संविधानिक लोकशाहीचीची तोडमोड करण्याच्या प्रयत्नात आहे. धर्माचे राजकारण आणि धार्मिक लोकशाही कोणताही देशाला रसातळाला नेऊ शकते, त्यामुळे आपण देशवासीयांनी देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी , अखंड बहुजनांच्या हितासाठी बहुजनांचे राज्य आणण्यासाठी लढले पाहिजे , असे देखील शाहनवाज खान यांनी नमूद केले.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »