Press "Enter" to skip to content

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करेल – जिल्हाप्रमुख खाजामिया पटेल यांचा विश्वास !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करेल, असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख खाजामिया पटेल यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.
शेकडो वर्षे प्रस्थापितांनी बहुजन समाजावर अन्याय केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण बहुजनांच्या मानेवर सत्तेच्या माध्यमातून इथला प्रस्थापित वर्ग राज्य करत आहे. हि परंपरा आता नक्कीच मोडणार आहे. देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील बहुजन समाज एकवटला आहे. न्यायहककसाठी पेटून उठला आहे, त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद दिसून येतील. ऍड प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल , असे ते म्हणाले.रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला ताकत देण्याचे काम करीत आहे. सत्ता परिवर्तनाच्या वादळाला आता रोखाने कोणालाही शक्य नाही, असे खाजामिया पटेल म्हणाले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »