Press "Enter" to skip to content

१५ व्या डॉ डी वाय पाटील टी २० क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात डी वाय पाटील टीमचा शानदार विजय !

डॉ श्याम मोरे

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नेरुळ येथील डॉ डी वाय पाटील स्टेडियम मध्ये नुकत्याच झालेल्या १५ व्या डॉ डी वाय पाटील टी २० क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात डी वाय पाटील ए टीमचा शानदार विजय झाला.

डॉ.डी. वाय. पाटील टी -२० लीगच्या अंतिम टप्प्यात होम टीम डी.वाय. पाटील ए आणि डी.वाय पाटील बी या दोन संघामध्ये एक सेमीफायनल सामना झाला आणि रीलायन्स -१ आणि कॅनरा बँक या इतर संघांत दुसरा सेमीफायनल सामना झाला.

पहिला उपांत्य सामना डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये डी. वाय. पाटील- ए व डी वाय पाटील-बी या संघांमध्ये खेळला गेला आणि डी वाय पाटील-ए संघाने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
दुसरा सामना रिलायन्स -१ आणि कॅनरा बॅंक दरम्यान खेळला जाऊन, रिलायन्स-१ अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या, रॉबिन उथप्पा, मनदीप सिंग, बारिंदर स्राण आणि आयपीएल खेळाडू प्रवीण तांबे, सरफराज खान, अनमुक्त चंद, सौरभ तिवारी असे अनेक भारतीय खेळाडू यात भाग घेतला.

अंतिम सामन्यात, रिलायन्स-१ ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रिलायन्स टीमने ६ विकेट च्या बदल्यात १८० रन बनविले. नंतर फलंदाजी करताना डी वाय पाटील ए टीम ने मनदीप सिंग (७८), शुभम रंजने (३९) आणि राहुल तवाटिया (३१) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ७ गडी राखून विजय मिळवला.

बक्षिस वितरण सोहळ्यास डी वाय पाटील समुहाचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, विश्वस्त शिवानी पाटील, माजी क्रिकेटपटू अबी कुरुविला, झहीर खान, उन्मेष खानविलकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.अंतिम सामना डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर संध्याकाळी ६ वाजता सुरू होऊन ९:४०वा समाप्त झाला. हा सामना जिओ टीव्ही आणि फेसबुक वरून थेट प्रवाहित केला गेला. डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियमला ​​पास च्या माध्यमातून विनामूल्य प्रवेश दिला गेला. अपेक्षेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भरपूर लोंकांचा भरभरून प्रतिसाद मिळेला आणि १५-२० हजार प्रेक्षकांनी हा सामना पाहिला.

कोकण दर्पण .