Press "Enter" to skip to content

जेएनपीटी प्रशासनाने छत्रपती शिवरायांसोबत रामदास स्वामींचा पुतळा बसविण्याच्या हालचाली थांबवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू – संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका !

उरण , कोकण दर्पण वृत्तसेवा : जेएनपीटी प्रशासनाने छत्रपती शिवरायांसोबत रामदास स्वामींचा पुतळा बसविण्याच्या हालचाली थांबवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने घेतली आहे.

उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची हालचाल सन २०१५ साली सुरू झाल्या असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू म्हणून रामदास स्वामींना दाखविण्याचा प्रयत्न केला. हे इतिहासाला धरून नसल्यामुळे याठिकाणी होणाऱ्या स्मरकामध्ये रामदासांचा समावेश करण्यात येऊ नये,अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने केली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पनवेल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे , कोकण अध्यक्ष मराठा सेवा – संघ संभाजी ब्रिगेड सचिन सावंत देसाई, महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमरजीत पाटील , आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेएनपी टी प्रवेशद्वार (दास्तान फाटा ) येथे स्मारक ऊभे करण्यात येत आहे . या स्मारकात अनेक शिल्पे बसविण्यात येणार आहेत . या ठिकाणी रामदास स्वामी व छत्रपती शिवरायांचे समुह शिल्प सुद्धा बसविण्यात येणार असल्याचे वृत्त २०१५ मध्ये प्रसारित झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने लढा सुरू झाला. यावेळी माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा ही भेट झालेली इतिहासात नोंद नसून समर्थ रामदासांचे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये काहीही योगदान नाही. येवढेच नव्हे तर रामदास स्वामी हे आदिलशहा आणि औरंगजेबाचे हेर असल्याचे उच्च न्यायालयातील महाराष्ट्र सरकार विरुद्ध मा.म. देशमुख यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावरील केस दरम्यान सिद्ध झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. राजांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन रयतेचे स्वराज्य निर्माण केले . त्याया त्यासाठी त्यांचे वडील शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याच शिवाजीराजांच्या गुरू , मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होत्या , कोंडदेव किंवा रामदास हे शिवरायांचे गुरू , मार्गदर्शक , शिक्षक , मदतनीस किंवा हितचिंतक नव्हते.
यावेळी पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, शिवकालीन ऐतिहासिक अशा शिवभारत , जेथे शकावली , राधामाधव विलास चंपू , पणतिपर्वत ग्रहणाख्यान , बुधभूषण , कृष्णाजी अनंत सभासद विरचित शिवचरित्रात कोंडदेव किंवा रामदास हे शिवराज्याचे गुरू , मार्गदर्शक , शिक्षक , हितचिंतक किवा प्रेरक असल्याचा कोणताही पुरावा नाही , त्यामुळे शिवरायासोबत रामदास दाखविणे हा शिवरायांचा , जिजाऊचा आणि शहाजीराजाचा केवळ अपमानच नव्हे तर चारित्र्यहनन आहे . हा तमाम रयतेचा अवमान आहे . शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून घेणे शिवरायांची बदनामी करणे आणि शिवरायावर ब्राम्हणी वर्चस्व लादणे , या उद्देशाने शिवरायांसोबत रामदासाचा पुतळा उभारला जात असल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी उभारण्यात येणाऱ्या नियोजित शिल्पामधुन रामदास स्वामी यांना छञपती शिवाजी महाराज यांच्या सोबत दाखवून इतिहासाचे विकृतीकरण करुन राष्ट्रीय महापुरुषांचा जे . एन . पी . टी प्रशासन अवमान करित असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्यावतीने तीव्र विरोध दर्शविण्यात आला. तसेच यावेळी लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही कारवाईसाठी आग्रही असल्याचेच त्यांनी सांगितले.
तसेच उभारत असलेल्या समुह शिल्पातून छपती शिवाजी महाराजांच्या सोबत दाखवलेले रामदासाचे शिल्प तात्काळ हटवण्यात यावे , अन्यथा , जे . एन . पी . टी . प्रशासना विरोधात मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करेल तद्नंतर निर्माण होणा या परिस्थितीस व कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास पुर्णपणे जे . एन . पी . टी . प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

कोकण दर्पण .