Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांचे हुकमी एक्के !

आमदार प्रशांत ठाकूर यांचे हुकमी एक्के !

पनवेल, प्रतिनिधी : पनवेल विधानसभा क्षेत्रात विजयाचा चौकार मारत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचा गड कायम राखला. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल अशी संभावना होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये पनवेल विधानसभा क्षेत्रात बिघाडी झाल्याने महायुती विरोधात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेगवेगळे लढले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकापचे उमेदवार माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या सोबत लढले. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी जोरदार टक्कर दिली. मात्र, महाविकास आघाडीच्या बिघाडाचा स्पष्ट फायदा आमदार प्रशांत ठाकूर यांना झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयाचा चौकार मारत पनवेलचा गड कायम राखला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात खारघरच मोठं योगदान आहे. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांना खारघरमधून सर्वात जास्त मताधिक्य घेतले. तब्बल २१ हजार मताधिक्यांचा लीड देण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे हुकमी एक्के यशस्वी झाले आहेत. आगामी काळात भाजपाला मोठे यश मिळवायचं असेल तर खारघर शहराप्रमाणे इतर विभागात बांधणी करावी लागेल. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी अहोरात्र योगदान देणारे त्यांचे हुकमी एक्के , त्यांची मेहनत महत्वपूर्ण ठरते.

पनवेल विधानसभेत भाजपच्या एकूण विजयाच्या रणनीतीत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निष्ठा आणि प्रामाणिक योगदान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे फलित ठरले आहे. भारतीय जनता पक्षाची खारघर शहरांमध्ये ताकद मोठ्या प्रमाणात असून पदाधिकाऱ्यांची संख्या ३०० ते ३५० पर्यंत आहे. पक्षांमधील कार्यकर्त्याला आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्याकडून वेळोवेळी विचारणा व मानसन्मान दिल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले. या विजयात आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर सरचिटणीस दीपक शिंदे ,युवानेते अमर उपाध्याय, युवानेते किरण पाटील, युवानेते समीर कदम, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक निलेश बाविस्कर, भाजपनेते वासुदेव पाटील , उपाध्यक्ष संजय घरात, युवानेते गुरु ठाकूर, युवानेते फुलाजी ठाकूर, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्यासारखे कार्यकर्ते भाजपची सदस्य संख्या वाढवताना मेहनत करताना दिसते,

लोकसभेला आठ हजाराचा असलेला लीड विधानसभेत आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना २१ हजारावर घेऊन जाण्याकरता भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने खूप मेहनत घेतली आणि आमदार प्रशांत दादा ठाकूर यांची रणनीती यासाठी खूप महत्वाची आहे या निकालावरून भविष्यात महानगरपालिकेची निवडणूक भाजपला आणखी सोपी झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील , खारघर महिला अध्यक्षा साधना पवार , युवा मोर्चा अध्यक्ष
नितेक्ष पाटील, सरचिटणीस अक्षय लोखंडे यांनी युवकांची मोट बांधून बाईक रॅली काढून वातारण निर्मित करण्यात योदान दिले. भाजप रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल यांनी सर्व समाजाला एकत्र करून आमद्रारांसोबत बैठकतडानाचा टक्का वाढला .भाजप सरचिटणीस दिपक शिंदे यांनी कार्यकर्त्याना
पोलिंग एजेंट पासून बूथ लेव्हलवर कामं करणाऱ्या कार्यकर्त्याशी संपर्क साधून मार्गदर्शन करून मतदानचया चिट्ट्या घरोघरी पोहचवल्या. इथे विरोधीपक्ष कमी पडले होते. भाजप युवानेते अमर उपाध्याय आणि नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी खारघर सेक्टर १२ मध्ये सोसायटी – सोसायटी मध्ये जाऊन 20 दिवस प्रचाराचा धडाका लावला. भाजप नेते विजय पाटील, रमेश खडक यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून अमर उपाध्यय यंच्यासह प्रचारात भक्कम आघाडी घेतली. भाजपनेते समीर कदम, जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली.

याव्यतिरिक्त खारघरच्या प्रमुख पॉकेटमध्ये सेक्टर एक दोन आठ मध्ये आरती नवघरे, केतन नवघरे आणि कोपरा व सेक्टर १० मध्ये नगरसेवक नरेश ठाकूर यांनी जोरदार काम केले. क्टर तीन चार पाच मध्ये नगरसेवक शत्रुघ्न काकडे, भाजप उपाध्यक्ष संजय घरत यांची रणनीती यशस्वी ठरली. सेक्टर सहा मध्ये प्रवीण बेरा , सेक्टर 11 मध्ये साधना पवार, प्रतीक्षा कदम, भाजप नेत्या गीता चौधरी , घरकुल स्पॅगिटीमध्ये नगरसेवक निलेश बाविस्कर, वास्तुविहार सेलिब्रेशन सेक्टर 18 मध्ये भाजप नेते समीर कदम, मुर्बिगाव सेक्टर 19 मध्ये जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू शेठ पाटील , सेक्टर १९, 20 मध्ये भाजपनेते किरण पाटील , नगरसेविका नेत्रा पाटील, सेक्टर 21 मध्ये वासुदेव पाटील, नगरसेविका अनिता पाटील यांनी प्रचंड मेहनत करीत भक्कम आघाडी सांभाळली. भाजप नेत्या गीता चौधरी, भाजप नेत्या बिना गोगारी , भाजप नेत्या मोना अडवाणी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली.

तर दुसऱ्या टोकावरून कीर्ती नवघरे हा विरोधी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहून विरोधी पक्षात धावपळ करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्याकडे खेचण्याचे कीर्ती नवघरे करत असतत्. एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते वाढत असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाची संख्या वाढू न देणं हे आमदार प्रशांत ठाकूर यांचं नियोजनच खारघर शहराला २१ हजाराचा मताधिक्य देण्यास कारणीभूत ठरले. विरोधी पक्ष कीर्ती नवघरे यांच्याकडे जेवढा दुर्लक्ष करतो तेवढा त्यांचा पक्ष खुळखुळा करण्यास कीर्ती नवघरे कारणीभूत असतो. विशेषत्वाने कॉलनी फोरमच्या नेत्या आणि शिवसेनेच्या उमेदवार लीनाताई गरड यांच्यावर सातत्यपूर्व टीकास्त्र सोडण्यात कीर्ती नवघरेअग्रेसर होते. विरोधकांवर टीका करण्याची निवडणुकीत त्यांनी एकही संधी सोडली नाही.
कॉलनी फोरम म्हणून काम करत असले तरी फोरमचे सर्रास पदाधिकारी कीर्ती नवघरे यांच्या मैत्रीपूर्ण संपर्कात असतात. तसेच शिवसेना उभाठा गटाचे पदाधिकारी कीर्ती नवघरे यांचे स्नेही आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ही बरीचशी कार्यकर्ते कीर्ती नवघरे यांच्या दैनंदिन संपर्कात असतात. कीर्ती नवघरे यांच्या इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संपर्कांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयला फायदा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचा कीर्ती नवघरे यांच्यावर असलेला विश्वास याचा वापर कीर्ती नवघरे यशस्वीरित्या करत आहे त्यामुळेच मागच्या सर्व निवडणुकीत फक्त भाजपानेच या ठिकाणी विजयी मिळवला. जोपर्यंत विरोधीपक्ष आपली पकड बनवणारा कार्यकर्ता तयार करू शकत नाहीत तोपर्यंत त्यांना कधीच यश मिळू शकणार नाही. एका दमात आमदार प्रशांत दादा ठाकूर यांची गेल्या पंधरा वर्षात खारघर मध्ये काय काय काम केलीत हे सांगणारा एकमेव कार्यकर्ता कीर्ती नवघरे आहे. प्रत्येक गोष्टीचा सखोल ज्ञान घेऊन लोकांसमोर आपल्याला फायद्याच्या गोष्टी मांडण्याची कला कीर्ती नवघरे मध्येच आहे.आगामी काळात भाजपला पनवेल मधून मोठं यश मिळवायचं असेल तर खारघर शहरासारखी बांधणी इतर विभागात करावी लागेल, हे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

One Comment

  1. JacquesEnaps December 19, 2024

    orb11ta снова работает!

Leave a Reply

Your email address will not be published.