इन्फिनिटी किड्स प्री स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न !
पनवेल, प्रतिनिधी : ॲड. तय्यब आहेरवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित इन्फिनिटी किड्स प्री स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या माजी सभापती लीनाताई गरड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
नवी मुंबई – खारघर सेक्टर ३४ ए येथे भव्य अशा ४ मजली इमारतीमध्ये इन्फिनिटी प्री स्कूलची वाटचाल आता सुरु झाली आहे. ॲड. तय्यब आहेरवाडी हे इन्फिनिटी स्कूलचे संस्थापक व मार्गदर्शक आहेत. तर
शाहजीन आहेरवाडी या इन्फिनिटी किड्स प्री स्कूलच्या अध्यक्षा आहेत.
यावेळी पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, उद्योजक मधू पाटील, पोलीस अधिकारी अरुण पढार, पोलीस अधिकारी अंजना गायकवाड, प्रा. मिलिंद ठोकळे, ऍड. बालेश भोजणे, ऍड महेंद्र संदानशिव, ऍड दिग्विजय शिंदे ऍड आशीर्वाद संदानशिव, ऍड.अहमद अहिरवाडी,अमित अहुजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इन्फिनिटी स्कूलच्या मुख्याध्यापिका आफरीन काझी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय राखून तळागाळातीन विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानून आम्ही शैक्षणिक कार्य सुरु केले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी यावेळी इन्फिनिटी स्कूलचे संस्थापक ॲड. तय्यब आहेरवाडी यांनी व्यक्त केली.
Be First to Comment