समाजवादी पार्टीच्या नवी मुंबईतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र
नवी मुंबई, प्रतिनिधी : समाजवादी पार्टीच्या नवी मुंबईतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले. नेरुळ, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष बांधणीचा निर्धार करण्यात आला. यावेळी समाजातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
समाजवादी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आर एन यादव यांच्या पुढाकारातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सपाचे प्रदेश सरचिटणीस दिनेश यादव, उपाध्यक्ष राजेंद्र यादव, प्रदेश सदस्य एस बी यादव, रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ. जी के डोंगरगावकर , जेष्ठ संपादक विश्वरथ नायर , समाजसेवक रब्बानी एस खान, समाजसेवक गया सुद्दीन शेख , सेवानिवृत्त कर्नल चंद्रशेखर रानडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी लालचंद्र यादव, बिंद कुमार यादव, चंद्रशेखर यादव, अजित यादव, सुरेश यादव, संजय यादव, विनोद यादव, जलंदर राजभर, मोबीन खान, इमरान खान, संगिना यादव, राजेश राजे, सर्वजित यादव ,
सुभाष यादव, शिव प्रसाद यादव यांच्यासह मान्यवर व कार्यकर्त उपस्थित होते.
Be First to Comment