गोरगरिबांचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
पनवेल (प्रतिनिधी) माणूसकी व कर्तव्याची जाण ठेवून सदैव काम करणारे, गोरगरिबांचे आधारस्तंभ व आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आज (रविवार, दि. ०२ जून ) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यकर्ते हितचिंतकांनी अभिष्टचिंतन केले.
आपल्या जवळ असलेली आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सढळ हस्ते खर्च करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७४ वा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमातही साजरा झाला. गरीब गरजूंना मदत, सामाजिक, सांस्कॄतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रांना भरघोस मदतीचा हात, रूग्ण, खेळाडू, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य, शिक्षण संस्थांना मदत, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, तळागाळात अनेक घटकांना मदत हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाज व्रत अजूनही सुरूच आहेे. आणि त्या अनुषंगाने समाजामध्ये सामाजिक सेवेचा मोठा भांडार त्यांनी उभारलेला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा माणसावर अधिक विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री कर्मवीर अण्णा, लोकनेते दि. बा. पाटील, थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांना आदरस्थान मानून त्यांनी नेहमीच कार्य केले आहे. जीवनात कर्तॄत्व फुलविणारी माणसे भेटत गेली आणि त्या प्रत्येक व्यक्तीने त्यांना चांगले विचार दिले, आणि त्यांनी ते अंगिकारले. सामाजिक जीवनात वावरत असताना आपण समाजाचे देणीदार लागतो या भावनेने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य सुरूच आहे. अशा या दानशूर, कर्तृत्ववान व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने ‘एक कृतार्थ संध्याकाळ’ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत पनवेलमध्ये कविसंमेलन, सन्मान पुरस्कार व सत्कार सोहळा, कोशिश फाउंडेशनच्यावतीने ओएनजीसी गेट समोर वृक्षारोपण, खारघर स्पोर्टस अकॅडमी व युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने खारघरमध्ये फर्स्ट टॉप रॅंकिंग ओपन रोड रोलर स्केटिंग, उत्कर्ष सांस्कृतिक, कला आणि क्रीडा मंडळ व आम्ही रक्तदाते संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नविन पनवेल येथे रक्तदान शिबीर, हार्मनी फाउंडेशन आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोशीर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप शिबीर अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Be First to Comment