जयभीम स्तंभ बनला आकर्षणाचे ठिकाण !
पनवेल, प्रतिनिधी : खारघर सेक्टर ३ – ४ येथील चौकात असलेला संविधान स्तंभ खारघरवासीयांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनला आहे. विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिचे औचित्य साधून संविधान मित्र मंडळ आणि मिलिंदभाऊ केदारे विचार मंचाच्या पुढाकाराने जयभीम स्तंभाचे सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. दिपकभाऊ निकाळजे यांच्या शुभहस्ते जयभीम स्तंभाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. समतेचा संदेश देणारा हा जयभीम स्तंभ आहे ,अशी भावना मितेश केदारे यांनी यावेळी व्यक्त केली.
जयभीम स्तंभ उभारणीत मितेश मिलिंद केदारे, सचिन पातोडे, आशिष कांबळे, सागर जाधव, कुणाल शिरसाट , नितीन केदारे , राजेश वाघमारे यांनी विशेषत्वाने परिश्रम घेतले आहेत.
Be First to Comment