Press "Enter" to skip to content

23 मे रोजी नवी मुंबई येथे बुद्ध जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन !

  • नवी मुंबई येथे बुद्ध जयंतीचा भव्य सोहळा
  • अखिल नवी मुंबई नागरी बुद्ध जयंती
  • महोत्सव समितीचे आयोजन !
  • भदंत विमलकित्ती गुणसिरी यांचे प्रमुख मार्गदर्शन

नवी मुंबई , प्रतिनिधी : अखिल नवी मुंबई नागरी बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या वतीने नवी मुंबई येथे आयोजन नवी मुंबई येथे बुद्ध जयंतीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमा दिनी नवी मुंबई शहरातील नेरुळ पश्चिमेकडे असलेल्या रामलीला मैदानात सायंकाळी ५ ते रात्री १० वाजे दरम्यान सदर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये भदंत विमलकित्ती गुणसिरी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. नवी मुंबईसह पनवेल आणि उरणमधील विविध बौद्ध धम्म संस्थानी सदर बुद्ध जयंती सोहळ्याचे संयोजन केले आहे.
बौद्ध समाजाला एकसंघ करणे, बौद्ध धम्मातील लोकांच्या जीविताचे, हक्क आणि अधिकारांचे रक्षण करणे हे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य होते. भारत देशाला बौद्धमय करण्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे जीवनकार्य होते. डॉ बाबासाहेबांच्या या जीवन कार्याला पुढे नेण्यासाठी बौद्ध समाजाला एकसंघ करणे गरजेचे आहे. ते ध्येय गाठण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी नवी मुंबईमध्ये भव्य अशा बुद्ध जयंती सोहळ्याचे आयोजन केल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.