रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील
केबीपी कॉलेजला नॅककडून ए प्लस प्लस ग्रेड (A++)
नवी मुंबई, प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद ( नॅक) यांचेकडून चौथ्या टप्प्यात A++ ग्रेड बहाल करण्यात आला. दि. २३ व २४ एप्रिल २०२४ रोजी तीन सदस्यीय नॅक समितीने महाविद्यालयाची तपासणी केली. या समितीमध्ये कुलगुरू प्रो.डॉ. कुलदीप शर्मा (चेअरमन), प्रो. पुष्पेंद्र सिंग (समन्वयक) आणि प्राचार्य डॉ. रामचंद्र राव यांचा समावेश होता. या समितीने महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, संशोधन, अध्यापन , अध्ययन व मूल्यमापन प्रक्रिया , अभ्यासक्रम, महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या बेस्ट प्रॅक्टीसेस या निकषांच्या आधारावर तटस्थपणे मूल्यमापन केले. या समितीने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला सर्वोत्तम मानांकन या प्रकारातील ए प्लस प्लस ग्रेड ( स्कोअर-3.51) बहाल केला. या सर्वोच्च मानांकनामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी आनंद व्यक्त केला. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांच्या कठोर परिश्रमाचे व योगदानाचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी महाविद्यालयास उत्कृष्ट ग्रेड मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तसेच आपल्या सर्व सहकाऱ्यांना वारंवार योग्य मार्गदर्शन केले.
महाविद्यालयास उत्कृष्ट ग्रेड मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, रयतचे संघटक डॉ. अनिल पाटील सचिव विकास देशमुख, सहसचिव प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दशरथ भगत, पी.सी.पाटील, संगीता पाटील व ललिता धारेश्वर यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
Thanks for the post
_________________
игровые автоматы на деньги с моментальным выводом денег на карту
Hello! Company Political Science a completely new scientific political system, which has never been seen before in the history of mankind. The document contains 10 pages of detailed description. You can buy this sex-free document for 950$, payment bitcoin. To obtain and pay for it, go to the proxy-tunneled self-hosted site, click Visit Site, register without using personal data, make payment and download the document. Thank you in advance.
Self-hosted website: https://dzt69hg.localto.net/
If pages don’t load – refresh.