पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पतंप्रधान तर श्रीरंग बारणे यांना हॅट्रिक खासदार करणार : गुजराती व राजस्थानी समाजाचा बैठकीत निर्धार !
पनवेल, प्रतिनिधी : अबकी बार चारसौ पार, फिर एक बार मोदी सरकार, श्रीरंग आप्पा बारणे तिसरी बार खासदार असा आश्वासक पाठिंबा विविध समाजाने देत मताधिक्य देण्यासाठी रणशिंग फुंकले. रविवारी गुजराती व राजस्थानी समाजाने पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तर श्रीरंग बारणे यांना खासदार बनवण्याचा निर्धार केला. गुजराती व राजस्थानी बैठक खारघर येथे पार पडली. पुन्हा मोदी सरकार केंद्रात येणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाचा आणि देशाच्या विकासाचा आलेख आणखी उंचावणार आहे, त्यामुळे या विकासाचे साक्षीदार होण्यासाठी मतांची आघाडी देण्याचा निर्धार यावेळी सर्व समाजाकडून करण्यात आला.
या बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, माजी महापौर कविता चौतमोल, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, गुजराती व राजस्थानी समाजाचे मान्यवर मंडळी कांतीभाई पटेल, निलेश पटेल, कघ्घाभाई पटेल, अशोक पटेल, हसमुख पटेल, सुजाराम चौधरी, हक्काराम चौधरी, मोतीलाल जैन, विनोद बाफना, जे. पी. पटेल, देवजीभाई पटेल, दिनेश पटेल, आशिष पटेल, आर. पी. जैन, कमल कोठारी, संजय जैन,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, सचिन शहा,अंजूबेन, प्रवीण बेरा, बिना गोगरी, कुणाल सांघानी, हसमुख सांघानी, तसेच खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, विजय पाटील, दीपक शिंदे, प्रसाद परब, संध्या शारबिद्रे यांच्यासह गुजराती आणि राजस्थानी समाजाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात सक्षम नेतृत्व काम करीत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सरकार येण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्रिक करणार असल्याची आश्वासक ग्वाही या बैठकीत समाजाने दिली.
यावेळी बोलताना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हंटले कि, मी नऊ निवडणुका लढवल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला आहे. यंदा तुम्हा सर्वांच्या जोरावर खासदारकीची हट्रिक होईल. दहा वर्षात संसदेत फक्त मावळचे नाही तर देशभरातील प्रश्न मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विकास काय असतो आणि कसा करायचा असतो हे जाणून घेतले आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या अनुभवातून यापुढे यापेक्षाही जास्त काम करण्याचा निश्चय केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे सहकार्य मला कायम राहिले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होण्याबरोबरच देशाची संस्कृती आणि परंपरा वृध्दींगत व संवर्धन करण्याचे झाले आहे तसेच भ्रष्टाचार संपवण्याचे काम केले आहे म्हणून देशाच्या भविष्यासाठी पुन्हा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजाचे प्रतिनिधित्व आणि सामाजिक सेवेचा वसा समाजाकडे आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आग्रही राहिलेल्या या समाजातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. वर्षभरात कोणतीही सुट्टी न घेता काम करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचाच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे गौरव आहेत. मावळ लोकसभा मतदार संघात २५ लाखापेक्षा जास्त मतदार आहेत त्यामुळे प्रत्येक घरोघरी उमेदवार पोहोचणार नसले तरी प्रत्येक विभागात ते पोहोचले आहेत. प्रत्येक निवडणुकीत या विभागाने मला मतांची आघाडी मिळवून दिली आहे त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी म्हंटले की, एकही दिवस सुट्टी न घेणारा जगातील एकमेव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने देशाला मिळाला आहे. सर्व समाज मोदींच्या पाठीशी उभा आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना या विभागातून लीड मिळाला आहे आणि त्याच धर्तीवर आप्पा बारणे यांनाही मतांची आघाडी मिळणार आहे. हा विजय तीन लाख मतांच्या आघाडीने झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे.
कोट-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून केलेले काम लक्षात घ्या. गोरगरीब जनतेसाठी, प्रत्येक समाजासाठी काम करत आहेत. यापुढेही विकासाचा महामेरू सुरू ठेवण्यासाठी सज्ज रहा, ही संधी वाया घालू नका. नवमतदारांना पण माझे आवाहन आहे नवभारताचे साक्षीदार व्हा. आपल्या मताचा अधिकार बजवा. – मोतीलाल जैन
कोट-
देशात सर्वत्र होत असलेला विकास पाहता आपला मत ४०० खासदार पार करण्यासाठी द्यायचे आहे. त्यासाठी जागरूक रहा. फिर एक बार मोदी सरकार आणायचे आहे. – विनोद बाफना
कोट-
आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच समाजासोबत राहिले आहेत. मोदीजींनी जगात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांचे निर्णय जगात पुढे नेणारे आहेत. त्यामुळे आपल्या संघटन कौशल्याने मोहीम फत्ते करू या.
– कांतिभाई पटेल
कोट-
सर्व देशाच्या अस्मितेसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे यांना विजयी करू या. आणि त्यासाठी सर्व समाज तुमच्या पाठीशी खंबीर आहे. आमच्या रक्तात कमळ आहे आणि बारणे महायुतीचे उमेदवार आहेत त्यामुळे आप्पा बारणे प्रचंड मतांनी विजयी होतील. – जे. पी. पटेल
कोट-
आपल्या मतांची ताकद लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी उपयोगी आणू या. जिथे भाजप तिथे आम्ही त्यामुळे आप्पा बारणे यांना जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार. – देवजीभाई चौधरी
Hi there,
My name is Mike from Monkey Digital,
Allow me to present to you a lifetime revenue opportunity of 35%
That’s right, you can earn 35% of every order made by your affiliate for life.
Simply register with us, generate your affiliate links, and incorporate them on your website, and you are done. It takes only 5 minutes to set up everything, and the payouts are sent each month.
Click here to enroll with us today:
https://www.monkeydigital.org/affiliate-dashboard/
Think about it,
Every website owner requires the use of search engine optimization (SEO) for their website. This endeavor holds significant potential for both parties involved.
Thanks and regards
Mike MacAlister
Monkey Digital