श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पनवेलमध्ये प्रचार दौरा आणि सभा !
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षाचे ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी पनवेलमध्ये प्रचार दौरा आणि सभा होणार आहेत.
यावेळी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, विधानसभा प्रमुख नितीन पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भिमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रासपचे अण्णा वावरे यांच्यासह महायुतीतील इतर पदाधिकारी, मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९ वाजता शेडुंग येथील हनुमान मंदिर येथून प्रचार दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पुढे बेलवली, लोणीवाली, वांगणी, आंबिवली, नेरे असा प्रचार दौरा होणार असून वाजे येथे सभा होणार आहे. त्यानंतर शिवणसई, दूंदरे, रिटघर, खानाव, मोर्बे, महालुंगी, चिंध्रण, पालखुर्द, वावंजे येथे प्रचार दौरा त्यानंतर खैरणे येथे सभा, पुढे नितळस, तोंडरे, पेंधर येथे प्रचार दौरा आणि नंतर नावडे व फेज २ तसेच पनवेल कोळीवाडा येथे सभा होणार आहे.
Be First to Comment