गद्दारांना, महाराष्ट्र द्वेषींना मतदान करणार का ?
शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे कडाडले !
- जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीचे
उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल !
मावळ, प्रतिनिधी : तुमच्यातील कोणी भाजपला ,महाराष्ट्र द्वेषींना , महाराष्ट्र विरोधकांना आणि गद्दारांना मतदान करणार आहे का ? असा थेट सवाल कार्यकर्त्यांना करीत शिवसेना युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे विरोधकांवर कडाडले. तुमचं एक मत केंद्रातील सत्ता बदलवू शकते , इतिहास घडवू शकते, असे रोखठोक प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी मावळ येथे केले. मावळ, पुणे , शिरूर , बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे मावळ येथील उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी भरण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीचे
उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, आमदार बाळाराम, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे तसेच पनवेल, उरण , कर्जतमधील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरीगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन व ग्रामदेवत भैरवनाथ मंदिरात आशिर्वाद घेऊन दुचाकी रॅलीस सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे स्मारक, चिंचवडगावात क्रांतीवीर चापेकरांच्या स्मारकास अभिवादन, महासाधू मोरया गोसावी मंदिरात आशिर्वाद घेऊन रॅली आकुर्डीतील खंडोबा माळ येथे पोहोचली. खंडोबा मंदिरात आशिर्वाद घेऊन परिवर्तन रथातून संजोग वाघेरेंसह महाविकास आघाडीचे नेते अभिवादन करत पदयात्रेची सुरुवात झाली. संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आकुर्डी प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा पोहोचली.
मावळच्या गड जिंकणार : संजोग वाघेरे
मावळ हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. हा आमचा गड आहे . तो आम्ही पुन्हा आमच्याकडे घेणार , मावळच्या गड जिंकणार असा विश्वास संजोग वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, “देशाची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. जनहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणा-या, देशातील जनतेची फसवणूक करणा-या प्रवृत्तीविरुध्द ही निवडणूक होत आहे. महागाई, बेरोजगारीविरुध्द आणि दडपशाहीच्या राजकारणाविरोधात निर्णय घेण्यासाठी मतदार तयार आहेत. पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघात गद्दारी गाडली जाईल आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय होईल. स्वाभीमानी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळचा गड कायम राखणार आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता विजयाला गुलाल उधळणार आहे”.
कोकण दर्पण
Be First to Comment