रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनिलजी तटकरे दोन लाखाने निवडून येणार – जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर.
माणगाव, प्रतिनिधी :
३२-रायगड लोकसभा मतदार संघातून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे या महायुतीचे उमेदवार सुनिलजी तटकरे यांना दिवसेंदिवस मतदारांचा वाढता पाठींबा पाहता व महायुतीच्या पदाधिकारी यांच्याकडून नरेंन्द्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी असलेले चैतन्य पाहता महायुतीचे रायगड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष उमेदवार सुनिलजी तटकरे कीमान २ लाख मतीने निवडून येतील असा विश्वास दक्षिण रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी व्यक्त केला आहे.
रायगड लोकसभा मतदार संघांतील सहा विधानसभा मतदार संघात महायुतीचे पाच आमदार काम करत आहेत. त्या पाचही विधानसभा मतदार संघात खासदार सुनिलजी तटकरे व स्थानिक आमदार यांच्या विकासकांचा धडाका बघता विरोधकांचा सुफडा साफ होणार यात तिळमात्र शंका नाही. लोकसभा निवडणूक ही संपूर्ण देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि जनतेने मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची गॅरंटी घेतली आहे त्यामुळे कुरघोडीच्या, जाती पातीच्या बंधनात जनता अडकणार नसून भारताला जगातील महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणार्या नरेंन्द्र मोदींच्या हातात देशाचा कारभार देण्याचे जनतेने ठरविले असून त्यात खारीचा वाटा आपला देखील असला पाहीजे या भावनेने जनता रायगड लोकसभा मतदार संघातून सुनिलजी तटकरे यांना मोठ्या फरकाने विजयी करतील.
मागील पाच वर्ष सुनिलजी तटकरे यांची लोकसभेची कार्यकीर्द त्यांनी यशस्वीपणे राबविली. करोना काळात गरजूंना केलेली मदत, जनतेसाठी हॅास्पिटल व अन्नधान्याची केलेली मदत, चक्रिवादळात जनतेच्या दारापर्यंत जाऊन केलेली मदत, मतदार संघात त्यांचा असलेला जनसंपर्क, करोडोंची केलेली विकासकामे, संसदेत विविध प्रश्नावर उठविलेला आवाज, प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड या त्यांच्या जमेच्या बाजू असून त्यात भरीस भर म्हणून शिवसेना, भारतीय जनता पक्षाची जिल्हयात असलेली मोठी ताकद यावेळी त्यांच्या मागे असून मोठ्या फरकाच्या म्हणजेच किमान दोन लाखाच्या फरकाने सुनिलजी तटकरे विजयी होतील यात तिळमात्र शंका नसल्याचा विश्वास यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षाकडून कोणी ठोस चेहरा दिसत नाही, विकासकामे करण्याची धमक दिसत नाही. जनतेने याआगोदर त्यांनाच निवडून दिले होते परंतु सर्वच गोष्टीत अपयशी ठरलेले अनंत गिते यांच्या अलिबाग येथील फॅार्म भरण्याच्या दिवशी तीनशेहून अधिक कार्यकर्ते नव्हते त्याच दिवशी त्यांचा पराजय नक्की झाला असून भावनेवर राजकारण करण्याचे दिवस संपले असून जनतेला आता विकास हवाय तो विकास फक्त सुनिलजी तटकरेच करू शकतात हा विश्वास संपादन करण्यात महायुतीला यश आले असून त्याचाच परिणाम म्हणून रायगड लोकसभा मतदार संघातून सुनिलजी तटकरे कीमान दोन लाखाच्या फरकाने विजयी होतील असा विश्वास शिवसेना दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Be First to Comment