महाविकास आघाडीचे मंगळवारी मावळमध्ये शक्तिप्रदर्शन !
संजोग वाघेरे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार !
मावळ, प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे मंगळवारी (दि. २३ ) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीचे दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री माणिकराव ठाकरे, आमदार रोहित पवार, खासदार डॉ अमोल कोल्हे आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. भव्य रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन विकास आघाडी संजोग वाघेरे यांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन करणार आहे . रॅली नंतर आकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे.
Be First to Comment