कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांचा शिवसेनेत प्रवेश !
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या
उपस्थितीत शिवसेना भवनात पक्षप्रवेश !
पनवेल, प्रतिनिधी : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा व पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लिना गरड, कॉलनी फोरमचे नेते तथा उद्योजक मधु पाटील, मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत शिवाजीराव अनगुडे, शिंदे गटाच्या जानव्ही घाडगे, भाजप उत्तरप्रदेश सेलचे गजेंद्र सिंग, विनय दुबे, नवीन पनवेल भाजपचे वार्ड अध्यक्ष तथा पेण तालुका रहिवाशी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र किशोर म्हात्रे, समाज सेवक शशिधर माळी, आकाश म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेते तथा कोकण संपर्क नेते सुभाष देसाई , शिवसेना उपनेते विजय कदम , मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना सहसचिव अवचित राऊत, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, शहर प्रमुख खारघर गुरुनाथ पाटील, उपशहर प्रमुख नंदू वारुंगसे, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, ग्रामीण विभागप्रमुख दत्ता फडके, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, नवीन पनवेल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Вы уже видели, появилась капа для выравнивания зубов http://aligner-price.ru/ .
Not enough money? Then sign up now https://binomo.com?a=de7617cc9494&t=0